google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महूद-पंढरपूर रोडवर पकडला 63.61 लाख 900 रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला

Breaking News

महूद-पंढरपूर रोडवर पकडला 63.61 लाख 900 रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला

 पंढरपूर-महूद रस्त्यावरून गांजा वाहतूक होणार असल्याची माहिती सांगोला पोलिसांना मिळाली होती.

महूद (सोलापूर) : पिकअप मधून घेऊन चाललेला 11 पोत्यामधील 318 किलोग्रॅम वजनाचा सुमारे 63 लाख 61 हजार 900 रुपये किंमतीचा गांजा सांगोला पोलिसांनी महूद-पंढरपूर रोडवर रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास पकडला आहे.


पंढरपूर-महूद रस्त्यावरून गांजा वाहतूक होणार असल्याची माहिती सांगोला पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोल्याचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांचेसह सहाय्यक पोलिस निरीक्षक बी.एन.यमगर, ए.एस.नाळे, आय.श्री.ढवणे, पोलिस हेडकॉन्स्टेबल आप्पासाहेब पवार, पोलिस नाईक अभिजीत मोहोळकर, पोलिस कॉन्स्टेबल श्री.पाटील, श्री.चोरमले, यांनी सांगोला पोलिस स्टेशनच्या हद्दीत महूद ते पंढरपूर रस्त्यावर हॉटेल जय तुळजाभवानी (गायगव्हाण ता.सांगोला) हद्दीत सापळा लावला होता.उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील या सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाल्या. त्यांच्या आदेशानुसार पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली होती. लॉकडाऊन असल्याने रस्त्यावर रहदारी कमी होती. अशावेळी गांजाची वाहतूक करणारे वाहन न थांबल्यास त्याचा पाठलाग करण्याची तयारी पोलिसांनी ठेवली होती. रविवारी रात्री उशिरा पांढऱ्या रंगाचे पिकअप भरधाव वेगाने पंढरपूर वरुन महूद कडे येताना दिसले. पहिल्या पोलिसांच्या पथकाने त्याला थांबण्याचा इशारा केल्याने हे वाहन दुसरे पथक असलेल्या हॉटेल जय तुळजाभवानीच्या समोर येऊन थांबले.पिकअप क्रमांक एम. एच. 12, जे.एफ.14 44 च्या वाहनचालकास पिकअप मध्ये काय आहे विचारले असता त्याने मोकळे कॅरेट असल्याचे सांगितले. त्यावेळेस उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी वाहनाची झडती घेतली असता वरच्या बाजूला 83 मोकळे कॅरेट ठेवून त्याखाली निळ्या रंगाच्या ताडपत्री खाली पांढऱ्या रंगाची अकरा पोती गच्च भरून गांजा ठेवलेला दिसून आला. अकरा पोत्यांमध्ये हिरवट रंगाचा बियासह असलेला 318.095 किलो ग्रॅम वजनाचा 63 लाख 61 हजार 900 रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे. पंचा समक्ष या मुद्देमालाचा पंचनामा करण्यात आला आहे.वाहनचालक कुमार पांडुरंग जाधव (रा.महूद ता. सांगोला) यास वाहन व मुद्देमालासह ताब्यात घेतले असून वाहन मालक सोमनाथ सुरेश कांबळे (रा.महूद ता. सांगोला) याच्या मालकीचा हा संपूर्ण गांजा असल्याचे कुमार जाधव याने सांगितले. पोलिस निरीक्षक सुहास जगताप या प्रकरणाचा तपास करीत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर महूद परिसरात गांजा या अमली पदार्थाची वाहतूक व विक्री होत असल्याचे समजल्याने खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments