पुढील पाच दिवस राज्यात अतिवृष्टीचा इशारा
मुंबई : मान्सून राज्यात सक्रीय झाला आहे. अनेक जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, राज्यात पुढील 5 दिवस जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तर दुसरीकडे मुंबईत मान्सूनचे आगमन झाले. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस झाल्याने मुंबईकरांची दाणादाण उडाल्याचे पाहायला मिळाले. कोकणातही मुसळधार पावसासह ढगफुटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तर दुसरीकडे कोकणात ढगफुटीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने अंदाज वर्तवल्याप्रमाणे आता रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवस महत्वाचे आहेत. सध्या जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या जोरदार पाऊस कोसळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 11 आणि 12 जून रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा पाऊस ढगफुटीप्रमाणे असेल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी खबरदारीचा आदेश दिला आहे.
0 Comments