google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यात कोव्हीड केअर सेंटरमध्ये डॉक्टरांची मनमानी डॉक्टर कधीही येतात - जातात वरून धडधडीत खोटेही बोलतात

Breaking News

सांगोल्यात कोव्हीड केअर सेंटरमध्ये डॉक्टरांची मनमानी डॉक्टर कधीही येतात - जातात वरून धडधडीत खोटेही बोलतात

 सांगोला / रोहित हेगडे दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे आणि येथील डॉक्टरांचा मनमानी कारभार सुरू आहे याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे . प्रशासनातील काही अधिकारी है स्वतः जातीने लक्ष देतात


परंतु येथील डॉक्टर मनमानी कारभार करत धडधडीत खोटेही बोलतात स्वतः कोरोना पोझिटिव्ह आहे अशी खोटी कारणे सांगत सीसीसी मध्ये येत नाहीत असे डॉक्टर फक पगारासाठी काम करतात का अशा या डॉक्टरांची तात्काळ चौकशी करावी व त्यांचे राजीनामे घ्यावेत . सांगोला शहरात २ कोव्हीड केअर सेंटर आहेत येथे दोन शिफ्टमध्ये डॉक्टरांचे काम चालायला पाहिजे एक शिफ्ट मध्ये कमीत कमी डॉक्टरोसह पाच ते सात कर्मचारी पाहिजेत परंतु सीसीसी मध्ये डॉक्टरांऐवजी कर्मचारीच असतात येथील डॉक्टर सकाळी एक राड करून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच तेही १० वा च्या पुढे तर कधी दुपारी २.३ च्या पुढे येतात . डॉक्टर बदल काही चौकशी केली असता ते खोटी कारणे देऊन घरीच असतात , जर डॉक्टरांनीच असे करत असेल तर येथे येणान्या कोरोना ज्यांचे हालच होतील व सूरु आहेत . कोरोना पोझिटिव आल्यानंतर पहिल्या स्टेजमध्ये रूपांना सीसीसी मध्ये नेले जाते व तेथे त्या रुग्णांना गोळ्या औषधे तसेच तेथील सोई द्यायच्या आहेत परंतु सांगोल्यातील सीसीसी मध्ये डॉक्टरच उपस्थित नसतात  अशावेळी कोरोना रुग्णांना जर काही त्रास होत असेल तर त्यांनी काय करायचे कोणाला | सांगायचे ? दिवसभर येथे फक्त एकच कर्मचारी असतो येथील डॉक्टरांची शिफ्ट नुसार ब्युटी | आहे सकाळी ८ ते रात्री ८ आणि रात्री ८ ते सकाळी ८ अशा दोन शिफ्टमध्ये येथील डॉक्टरांसह चार ते पाच कर्मचान्यांची ड्युटी आहे परंतु येथील डॉक्टर त्यांच्या मनाने व | सोयीने कधी येतात जातात . येथील डॉक्टरांना वेळा बद्दल तसेच काही माहिती विचारली  असता उलट सुलट बोलत आम्ही डॉक्टर आहोत आम्हाला आमचे समजते आम्ही कधी यायचे कधी जायचे आमचे आम्ही बन तसेच काहीही अडचणी संगत येथील त्यांचे हाल करत आहे डॉक्टरांना देवासमान मानले जाते परंतु येथील डॉक्टर जर असे करत असतील तर यांना काय म्हणावे ? कामचुकार डॉक्टरांना रुणांच्या जीवाशी खेळण्याचा कोणताही आणि कसलाही अधिकार नाही . जर डॉक्टरच खोटे बोलत असतील आणि कामे करत नसतील तर स्यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी काय करावे ? भेट देऊन आणि फोन करून डॉक्टरांना माहिती विचारले असता आम्हीच कोरोना पॉझिटिव्ह आहे असे खोटे सांगतात त्यांचा रिपोर्ट मागितला असता तर आम्ही रिपोर्ट करत नाही असली न शोभणारी उत्तरे देतात अशा निष्काळजी डॉक्टरांना प्रशासनाने तात्काळ निलंबित करावे व तेथील रुग्णांची सोय करावी .

Post a Comment

0 Comments