google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील सर्व पत्रकारांचे परिवारासह तातडीने लसीकरण करून विमा संरक्षण द्यावे : रविंद्र कांबळे

Breaking News

सांगोला तालुक्यातील सर्व पत्रकारांचे परिवारासह तातडीने लसीकरण करून विमा संरक्षण द्यावे : रविंद्र कांबळे

 सांगोला तालुक्यातील सर्व पत्रकारांचे परिवारासह तातडीने लसीकरण करून विमा संरक्षण द्यावे :  रविंद्र कांबळे


सांगोला  : प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या लसीकरणावरही केंद्र आणि सरकार भर देत आहेत. अशावेळी सांगोला  तालुक्यातील वृत्तपत्राचे व डिजिटल मीडियाचे सर्व पत्रकार व त्यांच्या परिवारासह तातडीने लसीकरण करून पत्रकारांना विमा संरक्षण देण्याची मागणी सांगोला डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे सांगोला तालुका अध्यक्ष रविंद्र कांबळे यांनी केली आहे.संपूर्ण राज्यात लसीकरणाची मोहीम पुन्हा एकदा जोमाने सुरू झाली आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना सर्व नागरिकांना मध्ये लॉकडाउन काळात जनजागृती करने व कोविड -19 चा प्रसार कमी व्हावा या करिता सांगोला तालुक्यातील वृत्तपत्र व डिजिटल मीडियाचे पत्रकार बांधवांनी अथक प्रयत्न केलेले आहेत.पत्रकार व कॅमेरामन हे सातत्याने बातमीदारी करण्याच्या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनाही धोका आहे. सांगोला तालुक्यातील आम्हा सर्व पत्रकार मंडळींना फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन आमचे तातडीने लसीकरण करण्यात यावे असे माझे मत आहे. आम्हा सर्व पत्रकार बांधवांना आमच्या परिवारासह लसीकरण करण्यात यावे अशी शासनाकडे करण्यात आलेले आहे तरी शासनाने वरील सर्व मागण्या मान्य करून पत्रकारांना दिलासा देण्याचे काम करावे.

Post a Comment

0 Comments