google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरासह तालुक्यात १ ९ ५ अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण लसीकरणावर भर ; नियम पाळण्याचे आवाहन

Breaking News

सांगोला शहरासह तालुक्यात १ ९ ५ अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण लसीकरणावर भर ; नियम पाळण्याचे आवाहन

 सांगोला तालुक्यात कोरोनाने पुन्हा एकदा आपले डोके वर काढले आहे . तालुक्यात आतापर्यंत ५४ हजार २१० कोरोनाटेस्ट केल्या आहेत . सध्या तालुक्यात एकूण १ ९ ५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत . यातील ६७ रुग्णांवर सिंहगड कोव्हिड सेंटर कमलापूर येथे उपचार सुरू असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ . सीमा दोडमनी यांनी सांगितले .


सांगोला तालुक्यात गतवर्षी वाकी घेरडी येथे पहिला रुग्ण सापडला होता . सांगोला तालुक्यात आजअखेर ५४ हजार २१० कोरोना टेस्ट घेतल्या आहेत . यामध्ये ३ हजार २ ९ १ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत . सांगोला शहरात १०६ रुग्ण , तर ग्रामीण भागात ८० असे १ ९ ५ अॅक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत . एकूण ६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे , असे वैद्यकीय अधिकारी डॉ . सीमा दोडमणी यांनी सांगितले . तालुक्यात पुढील काळात कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास सांगोला शहरातील ३ खासगी दवाखान्यातील १०० बेडराखीवठेवण्यात आले प्रशासनाकडून वेळोवेळी लॉकडाऊनव सतत केलेल्या प्रतिबंधामुळे सध्यातरी कोरोना आटोक्यात आला असला तरी शासनाने दिलेले नियम व अटी यापुढेही लागू राहणार आहेत . सांगोला शहरात मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करून सर्वच दुकानदार व भाजीविक्रेते यांना कोरोना तपासणी बंधनकारक केली आहे . शहरात सध्या १०६ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत . त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे मुख्याधिकारी केंद्रे यांनी सांगितले . १६ जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय येथे कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले . १ हजार ७ ९ २ कर्मचाऱ्यांना लसीकरण केले आहे . आतापर्यंत ४५ ते ५ ९ या वयोगटातील कर्मचारी व नागरिक यांना ६ हजार ९९ २ जणांचे लसीकरण केले आहे . यातील काहींना दुसरा डोसही देण्यात आला . ४५ वर्ष पूर्ण झालेल्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यावर कोरोना लस देण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले .

Post a Comment

0 Comments