सोलापूर:- ज्याअर्थी , सार्वजनिक आरोग्य विभाग , मंत्रालय , मुंबई यांचेकडील पत्र दि . १४ मार्च , २०२० अन्वये कोरोना विषाणू ( कोहीड -१ ९ ) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा , १८ ९ ७ मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करणेत आलेली आहे आणि त्याबाबतची नियमावली प्रसिद्ध केली असून जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हीड -१ ९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे .
त्याच प्रमाणे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदी प्रमाणे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष , जिल्हा आपत्ती प्राधिकरण हे कोणतीही आपत्ती रोखण्यासाठी किंवा आपत्ती विरुद्ध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी सक्षम प्राधिकारी आहेत . ज्याअर्थी , मुख्य सचिव , महाराष्ट्र शासन , आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन , महसूल व वन विभाग , मंत्रालय , मुंबई यांचेकडील क्र . DMU / २०२० / CR- ९ २ / DisM - १ दि . २ ९ .६.२०२० रोजीच्या आदेशामध्ये त्या त्या जिल्ह्यातील परिस्थिती प्रमाणे संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यातील रुग्ण स्थितीनुसार आदेश काढणेबाबत सर्वाधिकार देणेत आलेले आहेत . ज्याअर्थी , शासनाकडील दि . २७.०३.२०२१ च्या आदेशान्वये राज्यात कोव्हीड -१ ९ संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असलेने कोव्हीड -१ ९ विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी दिनांक १५.०४.२०२१ पर्यंत प्रतिबंधात्मक सूचना / आदेश निर्गमित करण्यात आले आहेत .. त्याअर्थी , मी मिलिंद शंभरकर जिल्हादंडाधिकारी , सोलापूर , फौजदारी प्रक्रिया संहिता १ ९ ७३ चे कलम १४४ ( १ ) ( ३ ) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार दिनांक १५.०४.२०२१ रोजी रात्री १२.०० वा . पर्यंत सोलापूर जिल्ह्यात ( पोलीस आयुक्तालय सोलापूर ची हद्द वगळून ) सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्यातील मोठया प्रमाणात वाढत असलेल्या रुग्ण संख्येवर आळा घालण्यासाठी खालीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी करीत आहे .१. सोलापूर जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी ०७.०० वा . ते रात्री ०७.०० वा . या कालावधीत चालू राहतील . तथापी , हे निबंध अत्यावश्यक सेवा / मनुष्य व प्राणी मात्रासाठी जीवनावश्यक वस्तु , भाजीपाला , फळे , किराणा , दुध व वृत्तपत्रे वितरण याबाबींना लागू राहणार नाही . २. तसेच प्रत्येक शनिवार व रविवार या दिवशी सर्व दुकाने पुर्णपणे बंद राहतील . तथापी , हे निबंध अत्यावश्यक सेवा / मनुष्य व प्राणी मात्रासाठी जीवनावश्यक वस्तू , भाजीपाला , फळे , किराणा , दुध व वृत्तपत्रे वितरण याबाबींना लागू राहणार नाही . ३. सोलापूर जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार / जनावरांचा बाजार बंद करण्यात येत आहे . ४. खाद्यगृहे , परमिट रुम / बार फक्त सकाळी ०७.०० ते रात्री ०८.०० या कालावधीत कोव्हीड -१ ९ चे मार्गदर्शक तत्त्वांचे यथोचित पालन करुन ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील . होम डिलीव्हरी चे किचन वितरण कक्ष रात्री १०.०० वा . पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे . जीम , व्यायामशाळा , स्पोर्टस कॉम्प्लेक्स , खेळाची मैदाने , जलतरण तलाव हे वैयक्तिक सरावासाठी सुरु राहतील तथापी सामुहिक स्पर्धा / कार्यक्रम बंद राहील . ६. कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये लिलावासाठी येणाऱ्या कृषी मालाच्या प्रकारानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीने नियोजन करुन एका दिवशी व एकाच वेळी लिलाव न करता मालाच्या प्रकारानुसार लिलावाचे दिवस व वेळा विभागून द्याव्यात व त्याचे नियोजन संबंधित जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था , सोलापूर यांनी करावे , तसेच बाजार समिती मध्ये येणाऱ्या मालाची त्या ठिकाणी किरकोळ विक्री करण्यास प्रतिबंध असेल . ७. प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये ( Containment Zone ) सर्व प्रकारची दुकाने , आस्थापना , धार्मिक स्थळे / प्रार्थना स्थळे , कार्यालये , बंद ठेवण्यात यावीत . तथापी , या ठिकाणी अत्यावश्यक सेवेची आस्थापना विहित केलेल्या अटी व शर्तीनुसार चालू ठेवण्यात यावीत . ८. सोलापूर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था , प्राथमिक व माध्यमिक शाळा ( इ . १० वी व १२ वी वगळता ) , महाविद्यालये यांचे नियमित वर्ग तसेच खाजगी शिकवणी वर्ग दि . १५.०४.२०२१ पर्यंत पूर्णत : बंद राहतील . ९ . सोलापूर जिल्ह्यातील सर्व अभ्यासिका / ग्रंथालय शासकीय नियम पाळून ५० % उपस्थितीस अनुज्ञेय राहून सुरक्षित अंतर ( Social Distancing ) व Sanitization चे नियम काटेकोरपणे पाळून सुरु राहतील . १०. सर्व प्रकारचे खेळाचे सामने , स्पर्धा यांवर दि . १५.०४.२०२१ पर्यंत बंदी असेल .सर्व शासकीय , निमशासकीय , स्थानिक स्वराज्य संस्था , खाजगी आस्थापना तसेच सर्व नागरिकांनी उपरोक्त नमुद केलेल्या सर्व उपाययोजना त्याच प्रमाणे शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करणेत आलेल्या मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करुन कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची खबरदारी घ्यावी . सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती / संस्था अथवा संघटना यांचेवर भारतीय दंड संहिता ( ४५ ऑफ १८६० ) कलम १८८ मधील तरतूदीनुसार दंडनिय / कायदेशीर कारवाईस पात्र असून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ , साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतूदी आणि इतर कायदे आणि विनियम यानुसार कारवाई करणेत येईल . अशा व्यक्ती , संस्था अथवा संघटना यांचे विरुद्ध संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी कारवाई करावी . सदरचा आदेश दि . ०१.०४.२०२१ रोजी माझे सही व शिक्क्यानिशी दिला असे . जिल्हाधिकारी श्री मिलिंद शंभरकर
0 Comments