नॅनो टेक्नॉलॉजी चा नॅनो टेक्सटाइल इंडस्ट्रीज मध्ये उपयोग केल्यास कोविड-१९ ला रोखू- प्रा. (डॉ.) पी. एस. पाटील.
सांगोला: सध्या संपूर्ण जगामध्ये धुमाकूळ घातलेल्या कोविड १९ या विषाणू ला रोखण्यासाठी नॅनो टेक्नॉलॉजी हे तंत्रज्ञान नॅनो टेक्सटाइल इंडस्ट्रीज मध्ये उपयोगात आणले तर कोरोना या रोगाला नियंत्रित अथवा नष्ट करू शकतो, असे प्रतिपादन विज्ञान महाविद्यालय मधील भौतिकशास्त्र विभाग आणि आय क्यू ए सी मार्फत आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चा सत्रातील उद्घानप्रसंगी प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. पी एस पाटील, यांनी व्यक्त केले.विज्ञान महाविद्यालय मधील भौतिकशास्त्र विभाग आणि आय क्यू ए सी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ९ आणि १० एप्रिल दरम्यान दोन दिवसांचे आंतर राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले असून एकूण २२५ सहभागी नी नाव नोंदणी केली आहे.आंतर राष्ट्रीय चर्चा सत्राची सुरुवात उद्धघटन समारंभाने झाली, सदरचे चर्चासत्र झूम मीटिंग द्वारे ऑनलाईन सुरू झाले असून उद्घाटनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे *प्रा डॉ. पी एस पाटील, प्र. कुलगुरु, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर* हे लाभले. सदरच्या चर्चासत्र साठी प्रमुख पाहुणे *प्रा डॉ. एफ. जे. स्तडलार , शेन झेन विद्यापीठ, चीन* हे लाभले. प्रा डॉ. एफ. जे. स्तडलार यांनी दूषित पाण्याचे प्रकाशाचा वापर करून पाण्याचे प्रथ करण कसे करता येईल , दूषित पाण्यातील प्रमुख घातक मूलद्रव्ये पाण्यातून वेगळे करून पाण्याचे निर्जंतुकीकरण कसे करता येईल हे सांगितले.तिसरे सत्र हे सहभागी च्या संशोधनाचे पीपीटी सादरीकरण होते, पीपीटी सादरीकरनाच्या माध्यमातून संशोधनातील ज्ञानाची देवाणघेवाण करून चर्चा सत्राचा मूळ हेतू साध्य केला.चर्चा सत्रातील सत्र प्रमुख म्हणून *प्रा. एस बी कुलकर्णी (मुंबई)*, आणि *प्रा ए. आर. बाबर (अकलूज)* यांनी काम पाहिले. चर्चा सत्राचे प्रास्ताविक आय क्यू ए सी चे समन्वयक डॉ धसाडे सर, तर उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ साहेबराव जुंदळे यांनी पाहिले. कार्यक्रमाचे आभार प्रा कांबळे सर यांनी मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि तांत्रिक बाबी अंतर राष्ट्रीय चर्चा सत्राचे समन्वयक प्रा डॉ ठोंबरे सर यांनी पार पाडले. तसेच विभागप्रमुख प्रा नवले सर यांनी ऑनलाईन कार्यक्रमावर नियंत्रण ठेवले.सदरच्या अंतर राष्ट्रीय चर्चा सत्रासाठी संस्था अध्यक्ष आदरणीय डॉ. गणपतराव देशमुख साहेब यांनी कौतुक केले व पुढील कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
0 Comments