सांगोला तालुक्यातील वाकी येथील हॉटेल अजिंक्यतारा हल्ला प्रकरणातील सर्व सहभागी आरोपी वर गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रीय चर्मकार महासंघाची मागणी . सांगोला येथील हॉटेल हल्ला प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून ऍट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघ सोलापूरच्या वतीने पोलीस उपअधीक्षक अतुल झेंडे यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
. याबाबत सविस्तर माहिती अशी की ६एप्रिल मंगळवार रोजी सांगोला महूद रोड येथील हॉटेलचे अजिंक्यताराचे मालक बाळासाहेब डांगे व व्यवस्थापक सागर बनसोडे,व गवळी या तिघांवर पंचवीस ते तीस जणांच्या घोळक्याने प्राणघातक हल्ला करून हॉटेलचे नासधूस करून हॉटेलचे मोठया प्रमाणात नुकसान केले आहे. या घटनेचे मुख्य सूत्रधार संतोष रोकडे,नाना रोकडे,सुधाकर सपाटे, अजय बुचाडे, हॉटेल सुष्टी चे मालक सनी इंगोले व इतर सर्व राहणार वाकी (शिवणे) तालुका सांगोला हे सर्वजण मिळून हॉटेल अजिंक्यतारा येथे येऊन मालक व कर्मचारी यांना जबर मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली परंतु सांगोला पोलीस स्टेशनने केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे पण त्यांच्यावर ऍट्रोसिटी ऍक्ट व दरोडाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे असे राष्ट्रीय चर्मकार महासंघ शहर जिल्हा सोलापूरच्या वतीने मागणीचे निवेदन पोलीस उपअधीक्षक झेंडे यांना निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अशोक लांबतुरे प्रदेश कार्याध्यक्ष संजय शिंदे,जिल्हा अध्यक्ष अजय राऊत,शहर अध्यक्ष परशुराम मब्रुखाने,सिद्धनाथ डांगे,सुनील रोकडे,गणेश कांबळे,शिवाजी रुपनर,व इतर उपस्थित होते*
0 Comments