google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महुद येथे धाडसी चोरी ; २१ लाखांचे दागिने लंपास खिडकीचे ग्रील , कुलूप तोडून चोरट्यांनी केला घरात प्रवेश

Breaking News

महुद येथे धाडसी चोरी ; २१ लाखांचे दागिने लंपास खिडकीचे ग्रील , कुलूप तोडून चोरट्यांनी केला घरात प्रवेश

 सांगोला / प्रतिनिधी दुकानाच्या खिडकीचे लोखंडी ग्रील व सेफ्टी दरवाजाच्या आतील कुलूप तोडून घरातील बेडरूममध्ये प्रवेश करीत चोरट्यांनी तब्बल २० लाख ४० हजार रुपये किंमतीचे ५१ तोळे सोन्याचे दागिने तसेच १ लाख रुपये रोख असा २१ लाख ४० हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला .


बुरखाधारी चोरट्यांनी शुक्रवार , दि . २ एप्रिल रोजी महुद ( ता.सांगोला ) येथे ही धाडसी चोरी केली . याबाबत मिळालेली माहिती अशी की , शैलेश नंदकुमार गांधी ( रा.महुद ) यांचे महुद येथील अकलूज चौकात रेडीमेड अॅण्ड स्टेशनरीचे दुकान आहे . गांधी यांच्या भाच्याचे १ एप्रिल रोजी नातेपुते येथे लग्न होते . त्यासाठी घरातील सर्वजण सोन्याचे दागिने घालून गेले होते . लग्न आटोपून सायंकाळी ५ वाजता महुद येथे घरी परतल्यानंतर सर्वांनी स्वतःजवळचे दागिने घरातील बेडरूम मध्ये असलेल्या कपाटात ठेवले . दि .२ एप्रिल रोजी घराच्या खालच्या माळ्यात असलेल्या दुकानात शैलेश गांधी दिवसभराचे व्यवहार केले . त्यानंतर सायंकाळी ७ वाजता वरच्या मजल्यावर असलेल्या घरी आले होते . रात्री १० वाजण्याच्या सुमारास घरातील सर्वजण आपापल्या बेडरूममध्ये झोपी गेले . शैलेश गांधी , पत्नी व आई हे हॉलमध्ये झोपले होते . मध्यरात्रीनंतर एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान दुकानाच्या खिडकीला असलेले लोखंडी ग्रील कापून आतील सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला . बेडरूममध्ये असलेल्या कपाटातील सोन्याच्याबांगड्या , पाटल्या , अंगठ्या , चेन , मंगळसूत्र व कर्णफुले असे मिळून ५१ तोळे सोन्याचे दागिने व १ लाख रुपये रोख असा एकूण २१ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे . पहाटे चार वाजण्याच्या सुमारास गांधी यांची पत्नी बेडरूममधील बाथरूममध्ये जाण्यासाठी गेली असता कपाटाचा दरवाजा तोडलेला दिसला . त्यावेळी तिने घरातील सर्वांना चोरटे ' सीसीटीव्हीत कैद गांधी यांनी आपल्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत . चोरीच्या घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता रात्री १.३० ते २.३० वाजण्याच्या दरम्यान बुरखाधारी अज्ञात व्यक्तींनी दुकानात प्रवेश केल्याचे दिसून आले . चेहऱ्यावर बुरखा असल्याने चोर ओळखता आले नाहीत.पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली . तसेच कसून तपास सुरू केला आहे . उठून जागे करीत बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता कपाटातील सर्व दागिने रोख रक्कम गायब झालेली होती . कपाटातील अन्य साहित्य , कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले . मुलगी सलोनी ही झोपलेली होती . बेडरूममध्ये दरवाजे खिडक्या व्यवस्थित होत्या . त्यामुळे जिन्यातून दुकानात जाऊन पाहिले असता दुकानाच्या खिडकीचे ग्रील तोडून सेफ्टी दरवाजाच्या आतील कुलूप तोडलेले दिसले .

Post a Comment

0 Comments