google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दैनिक सांगोला सुपरफास्टचे सहसंपादक सचिन भुसे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार या पुरस्काराने गौरविण्यात आले.

Breaking News

दैनिक सांगोला सुपरफास्टचे सहसंपादक सचिन भुसे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार या पुरस्काराने गौरविण्यात आले.

 पत्रकार सचिन भुसे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदर्श पत्रकार पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम  संपन्न सांगोला प्रतिनिधी : पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने  दैनिक सांगोला सुपरफास्टचे सहसंपादक सचिन भुसे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार या पुरस्काराने गौरविण्यात आले.    पंढरपूर येथील हॉटेल इन मध्ये पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आदर्श पत्रकार पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पार पडला


. दरम्यान सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधीक्षक विक्रम कदम, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी  विठ्ठल जोशी, हभप चैतन्य महाराज देगलूरकर, जेष्ठ पत्रकार  बाळासाहेब बडवे, स्वेरी काॅलेजचे प्रा.बी. पी.रोंगे, राज्य अध्यक्ष यशवंत पवार, राज्य सचिव डॉ. आशिषकुमार सुना, सोलापूर शहर कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी, उपाध्यक्ष बीपिन दिड्डी, अण्णा धोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. पत्रकार सचिन भुसे यांना फेटा , पुष्पहार, शाल, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले .या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी केले होते. या कार्यकमास इस्माईल शेख, दैनिक तुफान क्रांती चे संपादक मिरझागालिब मुजावर, प्रशांत माळवदे, संगप्पा कांबळे, बाबा काशीद, संभाजी गोसावी, आदम बागवान उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जोशी यांनी केले तर आभार जिल्हा अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी मानले. सचिन भुसे यांना महाराष्ट्र राज्य ऑल जनरलिस्ट, सत्यमेव जयते पाणी फाउंडेशन अभियान, अस्तित्व समाज विकास संशोधन संस्था, दैनिक एकमत, दैनिक पंढरी भूषण, दैनिक माणदूत एक्स्प्रेस, दैनिक सांगोला नगरी, दैनिक तुफान क्रांती, यासह राजकीय सामाजिक पक्षाकडून तसेच विविध संघटनांकडून पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने  पत्रकार सचिन भुसे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार हा पुरस्कार मिळाल्याबददल त्यांचे सर्व स्तरतून अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments