सांगोला तालुक्यात " ब्रेक द चेन " मधिल नियमांची पायमल्ली करत, अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट ; प्रशासनाचे जाणीव पुर्वक दुर्लक्ष !
सांगोला तालुक्यातील अनेक गावात अवैध दारू विक्रीचे धंदे शासनाने " ब्रेक द चेन " मध्ये घालून दिलेले सर्व नियम जुगारून राजरोसपणे सुरू असल्याचे पहायला मिळत आहेत.तालुक्यातील ग्रामीण भागातील छोटे मोठे अवैध दारू विक्री करणारे नागरिक सांगोला शहरासह तालुक्यात असणाऱ्या काही ठोक व किरकोळ दारु विक्रेत्यांच्या दुकानाच्या आजूबाजूला थांबून दुकानरांशी फोनवरून संपर्क साधून सकाळी ७ ते ११ या वेळेत चोरी छुप्या पद्धतीने दुचाकी, चारचाकी वहानांमधून मोठ्या प्रमाणावर अवैध दारुची वहातुक करत आहेत. या सर्व प्रकाराकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तसेच पोलीस प्रशासनाचे जाणीव पुर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे. पोलीस प्रशासन सकाळी ११ वाजले नंतर रस्त्यावर उतरून कारवाई करत असल्याचे दिसून येते. त्या वेळेस अवैध दारू विक्रेते दारू घेऊन आपल्याला ठिकाणी जाऊन दारू विक्रीला सुरुवात करतात.त्यामुळे ही अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी संबंधित प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. परंतु ते होताना दिसत नाही. काही महिन्यापुर्वी सांगोला तालुक्याला लाभलेले कणखर पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर हे या सर्व प्रकाराकडे लक्ष देवून या अवैध दारु विक्रीला लगाम लावणार का ? असा प्रश्न तालुक्यातील नागरिकां मधून उपस्थित केला जात आहे.
0 Comments