लग्न ठरलेल्या तरुणीची प्रियकरा सह आत्महत्या जियेंगे तो साथ मरेंगे तो साथ ; एकाच दोराने घेतली फाशी कळमनुरी तालुक्यातील गुंडळवाडी शिवारात एका प्रेमी युगलाने झाडाला एकच दोरखंडाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
या घटनेने गावात खळबळ माजली आहे . अजय केशव डुकरे (१८) आणि सरस्वती देविदास कऱ्हाळे (१७) अशी दोघांची नावे आहेत.केशव डुकरे यांच्या शेतात हळदीची काढणी सुरू असल्याने अजय हा शेतात जातो म्हणून रात्री १० वा.घरून निघाला होता. अजय हा नेहमी शेतात जात असल्याने कुटुंबातील कोणाला काही शंका आली नाही. दुसऱ्या दिवशी शेजाऱ्यांना डुकरे यांच्या शेतात दोघे जण गळफास घेऊन झाडाला लटकलेले आढळले. गावात ही वार्ता वाऱ्या सारखी पसरली . गावकरी जमा झाल्यावर ते अजय आणि सरस्वती असल्याचे समजले. अजय हा परभणी येथे सैनिकी शाळेत शिक्षण घेत होता. तर सरस्वती हिचे वडील गुंडळवाडी येथे सालदार म्हणून काम करीत होते. सरस्वती हिचा विवाह ठरल्याने कुऱ्हाळे कुटुंब त्यांच्या मूळगावी राजदारी ता .औढा येथे जाणार होते.
0 Comments