सांगोला : शहर व तालुक्यात चालणान्या अवैद्य धंद्यांसह बेकायदेशीर सावकारी , बनावट दारू , गुटखा , मटका , वाळू चोरीवर तत्काळ कडक कारवाई करा , जेबीट अंमलदार कारवाई करीत नाहीत त्यांची तत्काळ बदली करा , तरीही ते ऐकत नसतील तर तसा अहवाल इकडील कार्यालयाकडे पाठवून द्या , मात्र कोणालाही पाठीशी घालू नका , अशा सक्त सूचना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगोल्याच्या पोलीस निरीक्षकांना केल्या आहेत
. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी शुक्रवारी मंगळवेढा पोलीस स्टेशनला भेट दिली . यानंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पोलीस अधिकारी , कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन निवडणूकीविषयी महत्त्वाच्या सूचना केल्या . यावेळी तेजस्वी सातपुते यांनी सायंकाळी उशिरा सांगोला पोलीस स्टेशनला भेट दिली . पोलीस अधिकारी , कर्मचाऱ्यांच्या अडी अडचणी जाणून घेऊन दप्तर तपासणी केली . यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील , पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर पोलीस अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते म्हणाल्या , सांगोल्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी आहे . तरीही पोलीस आपल्या परीने चांगले काम करीत आहेत असे सांगून सांगोला शहर व तालुक्यात सुसाट वेगाने दुचाकीचालवणाऱ्या विशेषता : दुचाकीच्या सायलेन्सरबदलूनकर्णकर्कश आवाज काढणाऱ्या दुचाकीस्वार कारवाई तर कराच . परंतु ज्यांनी सायलेन्सर बदलून दिले त्यांनाही नोटीस बजावा . धाबे , हॉटेल्स आदी ठिकाणी बनावट दारूसह बेकायदेशीर दारू विक्री होत असेल तर बीट अंमलदारांनी छापे टाकून कारवाई करावी . त्यांच्याकडून कारवाई होत नसेल तर त्यांची तत्काळ बीटमधून बदली करा . मटका , गुटखा , जुगार , सावकारकी अशा अवैध धंद्यावर कारवाई करताना कोणालाही पाठीशी घालू नका अशा सशक्त सूचना केल्या आहेत . सांगोला शहर व तालुक्यात कोठेही अवैध धंदे चालू असतील तर नागरिकांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा , असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले .
0 Comments