‘आणखी कडक निर्बंध हे घालावेच लागणार, नियमावली उद्या-परवा जाहीर करणार’ – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज येणारे नव्या पॉझिटिव्ह रूग्णांचे आकडे धडकी भरवणार आहेत.
राज्यातील काही ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत तर काही जिल्हयांमध्ये अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अशाच प्रकारे वाढत राहिल्यास आणि जनतेने कोरोनाचे नियम नाही पाळल्यास राज्यात आणखी कडक निर्बंध किंवा लॉकडाऊनचा विचार करावा लागेल असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले. दरम्यान, त्यांनी विरोधकांवर टीका देखील केली. विरोधकांनी मला विलन ठरवले तरी चालेल पण मला माझा महाराष्ट्र महत्वाचा आहे. कोरोनाच्या काळात देखील विरोधकांचा शिमगा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. वेळ आल्यानंतर विरोधकांना उत्तर देणार असं ते म्हणाले.राज्यातील एकही रूग्ण आपण लपवला नाही. सध्या विलगीकरण बेड 2 लाख 20 हजार आहेत. आताच 62 टक्के बेड भरले गेले आहेत. राज्यात आयसीयू बेड 20 हजार 519 असून त्यापैकी 48 टक्के भरले आहेत. सध्या ऑक्सिजनचे बेड 62 हजार 25 इतके आहेत. फिल्ड रूग्णालय उभारणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. सध्या विरोधकांनी राजकारण करू नये असं मुख्यमंत्री सांगितले.कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी भाजप आणि काँग्रेस नेत्यानं केलेल्या मागण्याचा समाचारच घेतला. आपल्याला एकमेकांच्या साथीनं कोरोनाच्या विरूध्द लढाव लागणार आहे. सध्या ब्राझिलमध्ये विचित्र परिस्थिती आहे. रशिया आणि फ्रान्समध्ये देखील परिस्थिती चिंताजनक आहे. लॉकडाऊन हा उपाय नाही हे मला मान्य आहे. पण ही कोरोनाची साखळी तोडायची कशी असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. दुसरा उपाय असेल तर जरूर सांगा, ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या पाळा असे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा बजावून सांगितले.कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क वापरा, सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळा. अशीच रूग्ण वाढ होत राहीली तर हॉस्पीटल तुडुंब भरून जातील. संसर्गाची लाट आपण रोखू शकतो. फक्त ती जिद्द आपल्यामध्ये असायला हवी. प्रत्येकांनी ठरवायला हवे की आपण कोरोनाला रोख शकतो. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध हे घालावेच लागणार, त्याबाबतची नियमावली उद्या-परवा जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पण त्यांनी संपुर्ण लॉकडाऊन करण्याचा इशारा देखील दिला आहे.


0 Comments