कोरोनाचा विळखा वाढू लागला ; सोलापूर जिल्ह्यात दिवसात ११ जणांचा मृत्यू ; ६४२ नवीन बाधित रूग्ण ! 


सोलापूर शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा दिवसोंदिवस वाढू लगाला आहे . काल गुरुवारी ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सोलापूर शहरातील ४,तर ग्रामीण भागातील ७ जणांचा समावेश आहे . जिल्ह्यात गुरुवारी नवीन ६४२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. आणखी ८४२ जणांचे अहवाल येणे बाकी असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे . कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोलापुरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढू लागले आहे. यासंदर्भात जिल्हा, महापालिका प्रशासन , आरोग्य व पोलिस प्रशासनाने कडक उपाययोजनाही सुरू केल्या आहेत . तपासण्या तसेच लसीकरणही वाढविले आहे . तरीही साथ रोखण्यास अद्याप यश आले नाही.गुरुवारी मृत्य पावलेल्यांमध्ये जिल्ह्यातील कापड बाजार बार्शी येथील ९१ वर्षीय पुरुष , नाईकवाडी प्लॉट बार्शी येथील ६८ वर्षीय पुरुष , सोहाळे ता . मोहोळ येथील ४३ वर्षीय महिला तर पंढरपूर तालुक्यातील दत्त नगर कराड रोड येथील ६९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे तर सोलापूर शहरातील कोर्नाक नगर विजापूर रोड येथभल ७१ वर्षीय पुरुष , पोगुल माळ रामवाडी परिसरातीला ५५ वर्षीय महिला , न्यू पाच्छा पेठ ५९ वर्षीय पुरुष , कृषि विकास नगर ८६ वर्षीय पुरुष , वेणुगोपाळ नगर ७५ वर्षीय पुरुष , पार्क चौक ८१ वर्षीय पुरुष , तर जम्मा चाळ भवानी पेठ येथील ७४ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.आजतागायत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ४६ हजार ००१ , तर शहरातील १६ हजार ३९९ , असे एकूण ६२ हजार ४०० जण कोरोना बाधित आढळून आले आहेत . त्यापैकी ग्रामीण भागातील १२३७ , तर शहरातील ७३१ , अशा एकूण १९६८ जणांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागापैकी ३२८९ , तर शहरातील २७५१ , अशा एकूण ६०४० जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत . आतापर्यंत जिल्ह्यातील ४१ हजार ४७५ , तर शहरातील १२ हजार ९ ०१ , असे एकूण ५४ हजार ३७६ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी , असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे .