सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : आमच्या शेतातून वाळूच्या गाड्या घेऊन जायच्या नाहीत असे म्हणाल्याच्या कारणावरून चिडलेल्या ७ जणांनी संगनमत करून हाताने , लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चाकूने दंडावर व काठीने पाठीवर मारहाण केल्याने पती - पत्नी गंभीर जखमी झाले . ही घटना मंगळवार १६ मार्च रोजी दु .२ च्या सुमारास महूद ता . सांगोला येथील लवटेमळा या ठिकाणी घडली . म्हाकू सदाशिव पाटील व शीतल म्हाकू पाटील अशी जखमी पती - पत्नीची नावे आहेत.ोमहूद लवटे मळा येथील म्हाकू सदाशिव पाटील व शीतल पाटील हे पती - पत्नी मंगळवार १६ मार्च रोजी दुपारी दोनच्या सुमारास शेतातील कांदा भिजवत होते .
त्यांच्या शेताशेजारी अजय बिरा घोडके याचीशेती असून तो शेतात पिकांना खत टाकत होता . दरम्यान म्हाकू पाटील यांच्या शेताशेजारून कासाळ ओढा गेला असल्याने त्यांनी अजय घोडके यास तुम्ही आमच्या शेतातून वाळूच्या गाड्या घेऊन जायचे नाही असे म्हणाला . यावेळी चिडलेला अजय घोडके यांनी म्हाकू पाटील यांना शिवीगाळ दमदाटी करू लागला . त्यावेळी विकास पाटील , तानाजी पाटील , नाना घोडके , संजय घोडके , शिवाजी पाटील , जयश्री उर्फ रूपाली घोडके यांनी म्हाकू पाटील व शीतल पाटील या पती - पत्नीला शिवीगाळ करून हाताने , लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागले . यावेळी संजय घोडके यांनी त्याच्या हातातील चाकूने म्हाकू पाटील यांच्या उजव्या दंडावर मारून जखमी केले . तर जयश्री उर्फ रूपाली घोडके हीने तिथेच पडलेली एक काठी उचलून शीतल हिच्या पाठीवर व दोन्ही हातावर मारहाण केली . दरम्यान या भांडणात शितल हिच्या गळ्यातील गंठण कोठेतरी पडून गहाळ झाले . याबाबत , म्हाकू सदाशिव पाटील रा . महूद ( लवटेमळा ) यांनी वरील ७ जणांविरूध्द सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे
0 Comments