google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 करोना वाढताच निर्बंध वाढले ठाकरे सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Breaking News

करोना वाढताच निर्बंध वाढले ठाकरे सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

 करोना वाढताच निर्बंध वाढले ठाकरे सरकारकडून नवीन नियमावली जाहीर सरकारने करोनाचा प्रभाव वाढल्याने घेतला  निर्णय करोना वाढताच निर्बंध वाढले ठाकरे सरकारकडून नवीन नियमावली जाहीर सरकारने करोनाचा प्रभाव वाढल्याने घेतला निर्णय महाराष्ट्राच्या चिंतेत गुरुवारी मोठी भर पडली. करोना संकट गडद झाल्याची जाणीव काल (१९ मार्च) सायंकाळी आलेल्या आकडेवारीने सरकारला आणि जनतेला करून दिली.


करोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच रुग्णसंख्येची आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली. त्यामुळे आरोग्य विभाग आणि राज्य सरकारची झोप उडाली असून, करोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून यासंदर्भातील नियमावली आज जाहीर करण्यात आली.

राज्यात करोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेऊन राज्य सरकारने करोनाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. यानुसार राज्यातील सर्व खासगी कार्यालय आणि आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारीही संख्या ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही, असं सरकारने स्पष्ट केलं आहे.

मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश काढण्यात आले आहेत. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी करोना परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असेही या आदेशात म्हटले आहे.नाट्यगृह, सभागृहांमधील उपस्थिती देखील ५० टक्के करण्यात आली आहे. सभागृहांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. चेहऱ्यावर मास्क व्यवस्थित लावलेला नसेल, तर प्रवेश देण्यात येऊ नये. लोकांकडून करोना नियमाचं पालन करवून घेण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ असेल, याची खातरजमा करून घ्यावी, असंही या आदेशात म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments