google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सावकारी पाशातून मुक्त होण्यासाठी त्याने घेतला महिलेचा जीव !

Breaking News

सावकारी पाशातून मुक्त होण्यासाठी त्याने घेतला महिलेचा जीव !

 सोलापूर जिल्हा सावकारी पाशातून मुक्त होण्यासाठी त्याने घेतला महिलेचा जीव !


सावकाराच्या कर्जातून त्याला मुक्त व्हायचं होतं पण ते शक्य नव्हतं. काही करून आज रिकाम्या हातानं परतायचं नाही असं त्यानं ठरवलं आणि सावकाराच्या पाशातून 

मुक्त होण्यासाठी खून पन्हाळा : खाजगी सावकाराच्या तगाद्याने तो वैतागला होता, काही झालं तरी आज कुठतरी मोठी गेम करायची आणि सावकाराचे कर्ज फेडायचे असं ठरवून तो घराबाहेर पडला आणि त्याने छबुबाईला रानात गाठलं, तिच्या अंगावरच्या सोन्याने त्याचे डोळे दिपले आणि त्याने अखेर तिचा जीव घेतला. 

  गगनबावडा (असंडोली) येथील  प्रकाश कुंभार हा तरुण सावकाराच्या पैशात अडकला होता, त्यातून त्याला सुटका करून घ्यायची होती पण ते शक्य होत नव्हतं ! दिवसरात्र त्याच्या डोळ्यासमोर सावकार होता. अखेर प्रकाशनं निश्चय केला, आज काहीही करायचं पण रिकाम्या हातानं घरी परतायचं नाही ! मोठी गेम करायचा निर्धार करुनाच तो घरबाहेर पडला. मनात काही ठरवत तो आपल्या सासुरवाडीच्या रस्त्याने निघाला. शेतात काम करीत असलेली ५८ वर्षे वयाची महिला छ्बुबाई त्याला दिसली. छ्बुबाई केरबा पाटील या महिलेच्या अंगावरील सोने पाहून त्याचे डोळे दिपले आणि सावकाराच्या पाशातून मुक्त होण्याचा मार्ग त्याला दिसला. 

  छाबुबाईच्या जवळ जाऊन त्याने गप्पा मारायला सुरुवात केली. छबुबाईच्या मुलाला लग्नासाठी एक स्थळ असल्याचं सांगितलं. छाबुबाई स्थळाच्या शोधात होतीच, प्रकाश कुंभार यानं मनात प्लॅन आखला होताच. आपल्या मोटार सायकलवर बसवून त्याने स्थळ दाखविण्याचं नाटक करीत तिला डोंगरात नेला आणि निर्जन परिसर पाहून तिचा गळा दाबला. मुलासाठी स्थळ पाहण्याआधीच तिने स्वर्ग पहिला. तिच्या अंगावरील चार तोळे सोने काढून घेतले. दागिने तर मिळाले होते, आता मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करायचा होता. प्रकाशने मृतदेह एका पोत्यात घातला, पोते मोटार सायकलच्या मागच्या बाजूला बांधले आणि गगनबावडा तालुक्यातील कुंभी नदीच्या काठावरील झाडीत फेकून दिले. 

  इकडे पन्हाळा तालुक्यातील कसबा बोरगाव परिसरात छबूबाई बेपत्ता असल्याची चर्चा होती दहा ते बारा दिवस तिचा काहीच पत्ता लागत नव्हता. पन्हाळा पोलीस शोध घेत होते पण काहीच मागमूस लागत नव्हता. पोलीस सगळ्या बाजूनी तपास करीत होते त्यामुळे त्यांनी सराफांच्या दुकानावरही लक्ष ठेवले. सोने विकण्यासाठी कोणी सराफाकडे आले होते काय ? याची चौकशी केली असता पोलिसांना प्रकाशचा सुगावा लागला. छबूबाई यांच्या मोबाईलवर अखेरचा फोन हा देखील प्रकाश याचाच असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांचा संशय पक्का झाला होता. हाच प्रकाश सराफाकडे सोने विकण्यासाठीही आला होता. पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. प्रकाश कुंभार सोने विकत असल्याचे त्यांना दिसले आणि पोलिसांची खात्री झाली. 

  प्रकाशने सराफाकडे विकलेले सोने छबूबाई यांच्या मुलाला दाखवले, हे सोने छबूबाईचेच असल्याचे मुलाने सांगितले आणि पोलिसांनी प्रकाशाला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवी केली पण पोलिसांनी आपला ख्याक्या दाखवताच त्याने सगळे कबूल केले. सोन्यासाठी आपण हा खून केला असल्याचेही त्याने सांगितले. मृतदेहही दाखवला. हा तपास लागणे आणि लावणेही पोलिसांसाठी आव्हानात्मक होते पण पोलिसांनी हे यश मिळवले. पन्हाळा पोलीस गगनबावडा पोलिस, शाहूवाडी पोलिस आणि  महामार्ग पोलिस या पथकांच्या परिश्रमाने एका खुनाचा शोध लागला आणि संशयित आरोपी गजाआड गेला. 

Post a Comment

0 Comments