वाकी ता सांगोला येथील वनविभागा अंतर्गत येत असलेल्या वाकी वन परिक्षेत्रातील हजारो झाडे पाण्याअभावी जळू लागली असल्याचे चित्र दिसून येत आहेत .
सांगोला वनपरिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी , वनपाल आणि वनमजुरांच्या दुर्लक्षामुळे शासनाचे लाखो रुपये खर्चुन लावलेली ही झाडे वाळून जात असल्याचे चित्र दिसत आहे . सांगोला येथे वनविभागाचे जवळपास पंचवीस एकराहून अधिक क्षेत्र असून या मध्ये लहान मोठी हजारो झाडे शासनाच्या विविध योजनेंतर्गत लाखो रुपये खर्चुन लावली आहेत . मध्यंतरी जोरदार झालेल्या पावसामुळे या वनविभागातील झाडे हिरवाईनी नटलेली होती.पण जसजसा कडक उन्हाळा जाणवू लागला , तसतसे या वन विभागातील वन संपत्तीकडे अधिकाऱ्यांचे , वनपालाचेआणि वन मजुरांचे दुर्लक्ष झाले असल्याचे स्थानिक पर्यावरणप्रेमींनी सांगितले आहे . या वन विभागात सागवान , लिंब , चिंच , वड , चंदन , करंज आदि प्रकारची हजारो झाडे सध्या वेळेवर पाणी मिळत नसल्याने जळत आहेत.या वन विभागातुन आचकदाणी , लक्ष्मीनगर , वाकी , खिलारे वस्ती येथील वाटसरूनी वाळलेल्या झाडांकडे आणि या वन संपत्तीकडे पाहून नाराजी व्यक्त केली आहे . या वन विभागातील झाडे जगविण्यासाठी वन विभागाच्या वतीने झाडांना पाणी घालण्याचे काम तेथील स्थानिकांना दिले असून नेमून दिलेल्या पाण्याच्या खेपा होत नसल्याची तक्रार ही स्थानिक वृक्ष प्रेमींनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली आहे.उन्हाळा सुरू होण्याच्या अगोदरच झाडे जळत असतील तर वेळीच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देवून ही वृक्ष संपत्ती जगविण्याचा प्रयत्न करावा , अशी मागणी वृक्ष प्रेमी नागरिक करीत आहेत.या वेळी वन परिक्षेत्र अधिकारी बाठे साहेब यांना भ्रमनध्वनीवरून या संदर्भात विचारणा करण्यासाठी
0 Comments