सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या . निवडणुकांनंतर विजयी तसेच पराभव झालेल्या सर्वच उमेदवारांना निवडणुकीचा खर्च सादर करावा लागणार आहे .
त्यामुळे आता सर्वच उमेदवारांची निवडणुकीचा खर्च सादर करण्याची लगबग सुरू आहे . निवडणूक खर्च सादर करण्यासाठी उमेदवाराची पायपीट टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने ऑनलाइन खर्च सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे . मात्र बऱ्याच उमेदवारांना याची माहितीच नाही तर अनेक उमेदवारांना ऑनलाइन खर्च सादर करण्याची प्रक्रिया किचकट वाटत असल्याने अनेक उमेदवारांनी ऑफलाइन खर्च सादर करणार असल्याचेसांगितले . सांगोला तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतीच्या ६५ ९ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली . निवडणूक रिंगणात १२७ ९ उमेदवार होते . या सर्व उमेदवारांना निवडणुकीनंतर महिन्याभराच्या आत खर्च सादर करावा लागतो . निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या विजयी उमेदवारांचे सदस्यत्व रद्द होऊ शकते तसेच पुढील ग्रामपंचायत निवडणुकीला उभे राहता येत नाही . त्यामुळे सध्या सर्वच उमेदवारांची निवडणुकीचा खर्च सादर करण्यासाठी लगबग सुरू आहे . निवडणूक आयोगाने ऑनलाईन खर्च सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे . तरी अनेक उमेदवारांना या प्रक्रियेची माहिती नसल्याची बाब पुढे आली आहे . अनेक उमेदवारांनी तहसील कार्यालयात जाऊन निवडणूक खर्च सादर करणार असल्याचे सांगितले . ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आता प्रत्येक उमेदवारांना निवडणूकी दरम्यान झालेल्या खर्चाचा हिशोब निवडणूक आयोगाच्या मर्यादित सादर | करण्यासाठी बिलांची जुळवाजुळव करण्यासाठी लगबग सुरू आहे . निवडणुकीचा खर्च हा तारीख निहाय सादर करावयाचा असून | जी बिले जोडली जाणार आहेत | तीही खात्रीपूर्वक जोडावी लागणार | आहेत . त्यामुळे सध्या उमेदवार | याच प्रक्रियेत गुंतले आहेत . ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च | सादर करण्यासाठी उमेदवारांना तहसील कार्यालयात पायपीट | करावी लागू नये ही प्रक्रिया अधिक | सुलभ व्हावी यासाठी ऑनलाइन | खर्च सादर करण्याची सुविधा | उपलब्ध करून दिली आहे . | पण ग्रामीण भागात नेटवर्कचीही | समस्या आहे . त्यामुळे ऑनलाईन खर्च सादर करण्यासाठी लिंक | बरोबर राहत नसल्याने अनेक | उमेदवारांनी ऑफलाइन खर्च | सादर करण्यास प्राधान्य दिले आहे
0 Comments