google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शाळा सुरू करण्याबाबत जनजागृती शिक्षक कर्मचारी त्याच्याकडून प्रभात फेरीचे आयोजन

Breaking News

सांगोला शाळा सुरू करण्याबाबत जनजागृती शिक्षक कर्मचारी त्याच्याकडून प्रभात फेरीचे आयोजन

 सांगोला ( प्रतिनिधी ) : - शाळा सुरू करण्याबाबत गावात जनजागृती करणे महत्वाचे असल्यामुळे शिक्षण विभागाकडून काल २५ जानेवारी रोजी सर्व गावात प्रतिष्ठित नागरिक , शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी , शिक्षक व ग्रामस्थ यांच्याकडून प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते . तालुक्यातील सर्व गावांगावामध्ये प्रभातफेरी काढण्यात आली . यावेळी शिक्षण , आरोग्य , ग्रामपंचायत व अन्य पदाधिकाऱ्यांकडून शाळा सुरू करण्याबाबत जनजागृती करण्यात आली . फेरीमध्ये मास्कचा वापर , शारिरीक अंतर याचे पालन करण्यात आले . शिक्षकांकडून कोरोनाविषयक पोस्टर , बॅनर तयार करून जनजागरण करण्यात आले होते


. यावेळी तालुक्यातील पाचवी ते आठवीच्या शिक्षकांची आणि कर्मचा - यांची आरटीपीसीआर चाचणी प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली . स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सहकार्यातून शाळा वर्गखोल्या व परिसर स्वच्छता , निर्जुतकीकरण , पाण्याची सुविधा यांची पुर्वतयारी अंतिम टप्यात असून उद्या बुधवार दि .२७ जानेवरीपासून तालुक्यातील इ .५ वी ते ८ वी च्या शाळा सुरु होणार आहेत . यावेळी ग्रामपंचायत स्तरावर प्राथमिक , माध्यमिक , शिक्षकेत्तर कर्मचारी , अंगणवाडी सेविका याची रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आल्या . प्रभातफेरीत सर्व शिक्षक बांधव , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले . शाळा सुरु होत असताना पालकांची लेखी संमती , सॅनिटायझर , मास्कचा वापर , सुरक्षित अंतर , हात धुणे याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी प्रकाश यादव यांनी केले आहे . कोरोना महामारीमुळे तब्बल दहा महिने बंद असलेल्या पाचवी ते आठवीचे वर्ग उद्या बुधवार दि . २७ जानेवारीपासून सुरू होणार असून तालुक्यातील १५६ शाळांमध्ये २२७३१ विद्यार्थी पुन्हा नव्याने शैक्षणिक प्रवाहात येणार आहेत . सदर उपक्रमात तालुक्यातील एकूण २२६८ अधिकारी व कर्मचा - यांची , तसेच ४८३ पदाधिकारी व नागरीक , असे एकूण २७५१ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली . त्यामध्ये १२ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले व उर्वरीत अहवाल निगेटिव्ह आले . एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करण्याचा हा सोलापूर जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग असल्याने या उपक्रमाचे पूर्ण सांगोला तालुक्यात कौतुक करण्यात येत आहे .

Post a Comment

0 Comments