google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 निवृत्त पोलीस हवालदाराची पत्नी व मुलासह गळफास घेवून आत्महत्या ; मिरज तालुक्यातील घटना

Breaking News

निवृत्त पोलीस हवालदाराची पत्नी व मुलासह गळफास घेवून आत्महत्या ; मिरज तालुक्यातील घटना

 निवृत्त पोलीस हवालदाराची पत्नी व मुलासह गळफास घेवून आत्महत्या ; मिरज तालुक्यातील घटना


सांगली : बेळंकी ता. मिरज, जि.सांगली येथील एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सावकारी कर्ज आणि शेअर मार्केटमध्ये झालेले कोट्यवधी रुपयांचे नुकसान यामुळे वडील, मुलगा आणि आई अशा तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती आहे.

निवृत्त पोलिस हवालदार आण्णासो गव्हाणे (वय 65), मालन आण्णासो गव्हाणे (वय 55) आणि मुलगा महेश अण्णासो गव्हाणे (वय वर्षे 30) या तिघांनी पहाटे घरात दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे खळबळ उडाली आहे.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीतून कर्ज बाजारीपणातून सदरची आत्महत्या केल्याची गावात चर्चा सुरु होती. मुलगा महेश याने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले होते. यात आर्थिक कर्ज झाले होते. कर्ज दिलेल्या लोकांनी वसुलीसाठी तगादा लावला होता. यातूनच घरातील तिघांनी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली आहे.

Post a Comment

0 Comments