देशातील सर्वात मोठी म्हणून ओळख असलेली सरकारी बँक म्हणजे एसबीआय (एसबीआय-स्टेट बँक ऑफ इंडिया) मध्ये आपले खाते असेल किंवा त्यामध्ये खाते उघडायचे असेल किंवा काही कामानिमित्त बँकेत जायचे असेल तर आपणास आता यापुढे तेथील असलेल्या लांबच लांब रांगेमधे उभे राहण्याची गरज नाही.
कारण बँक लांब रांगापासून लोकांना दिलासा देण्यासाठीच आता ” नो क्यू सर्विस ” देत आहे. या बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, कोणीही हे अॅप डाउनलोड करुन त्यांच्या जवळच्या शाखेत जाऊ शकणार आहे.
एसबीआयची नो क्यू सेवा
बँकेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, स्टेट बँक “नो क्यू” अॅप आपल्याला शाखेत न येता कोणत्याही ठिकाणी आपल्या सोयीनुसार व्हर्च्युअल टोकन बुक करून देते. नो क्यू अॅपद्वारे आपण आपल्या जवळच्या शाखेत व्हर्च्युअल क्यू तिकिट बुक करू शकता आणि रांगेत आपली वास्तविक स्थिती जाणून घेऊ शकता.
बँक म्हणते की तुम्हाला बँकेत कधी पोहचणे शक्य आहे त्यानुसार तुम्ही हे क्यु तिकिट बुक करू शकता आणि लांब रांगेत जाणारा आपला मौल्यवान वेळ वाचवू शकता. एसबीआयची नो क्यू सेवा कशी वापरावी
कोणतीही व्यक्ती (एसबीआय किंवा एसबीआय नसलेले ग्राहक) ज्याला सेवेचा लाभ घेण्यासाठी एसबीआय शाखेत यायचे आहे, ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोनमध्ये नो क्यू मोबाइल अॅप स्थापित आहे तो व्हर्च्युअल तिकिट बुक करून याचा लाभ घेऊ शकणार आहे. हे मोबाइल आधारित एप्लीकेशन आहे जे ग्राहकांना कोणत्याही बँकेची शाखा आणि कोणत्याही बँकेत कोणतीही सेवा जाणून घेण्यासाठी क्यू तिकिट प्रदान करते. हे अॅप वापरल्यानंतर बँकेत उभे राहून तासनतास रांगेत थांबण्यापासून सुटका होईल. याशिवाय कोणत्या बँकेत किती वेटिंग आहे, कोणत्या शाखेत किती ग्राहक आहेत हे सर्व नो क्यू अॅपद्वारे कळेल. आता आपण काही मिनिटातच आपले काम आटोपू शकता
आपल्याला शाखेत कोणत्या वेळेस पोहोचायचे हे देखील आपण यात पाहू शकता. पूर्व-निर्धारित वेळी बँकेत पोहोचून, आपण ज्या काउंटरवर आपले काम आहे तेथे ई-टोकन दाखवून काही मिनिटांतच आपले व्यवहार करू शकणार आहात. या सेवेमुळे बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
0 Comments