करमाळा (प्रतिनिधी); तलाठ्याने आपले काम कमी करण्यासाठी व इतर सोयी साठी तलाठी आपल्या सोबत एक खाजगी सहकारी ठेवतात, अनेक ठिकाणी लोकांनी तलाठीच माहीत नसतो, तो खाजगी व्यक्तिच सगळं काम पाहत असतो. काही ठिकाणी ‘चहा पेक्षा किटली गरम’ अशी सुद्धा अवस्था आढळून आली
महसूल प्रशासनाच्या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे असे म्हटले आहे की तलाठी यांना नेमून दिलेल्या जागी त्यांनी कामे करावीत या शिवाय कोणतेही दाखले घेताना दर पत्रक ची सूची कार्यालयात लावणे बंधनकारक आहे.
याशिवाय आपला मोबाईल क्रमांक देखील तलाठी कार्यालयाच्या ऑफिसमध्ये लिहिणे आवश्यक आहे जर का तलाठ्यांच्या ठिकाणी खाजगी व्यक्ती काम करीत असताना आढळल्यास तलाठ्यावर शिस्तभंग ही नोटीस बजावण्यात येईल असे महसूल मंत्रालयाच्या कक्ष अधिकारी यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
0 Comments