PM Kisan योजना घोटाळा ; १ हजार ५२७ बोगस लाभार्थींकडून दीड कोटींची वसुली होणार ; तहसिलदार योगेश खरमाटे यांचे आदेश !
सांगोला ( विषेश प्रतिनिधी ) ; केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान योजना तालुक्यातील बोगस शेतकऱ्यांनी अक्षरशः पोखरून काढली आहे . सांगोला तालुक्यातील नोकरदार , शिक्षक , डॉक्टर , सेवानिवृत्त अधिकारी , उद्योगपती , पदाधिकारी , व्यापाऱ्यांनी बनवेगिरी करत पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेतला असल्याचे पडताळणीत उघड झाले आहे .
बोगस लाभार्थ्यांनी येत्या आठ दिवसात पैसे जमा करावेत अन्यथा पीएम किसान सन्मान योजनेचा निधी परत न करणाऱ्या बोगस लाभार्थ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा तहसिलदार योगेश खरमाटे यांनी दिला आहे .
पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत पोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची माहिती शासनाने केंद्रीय आयकर विभागाशी पडताळून करून पाहिल्यानंतर बरेच लाभार्थी हे आयकर भरत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे . सांगोला तालुक्यात तब्बल १ हजार ५२७ बोगस लाभार्थ्यांनी १ कोटी ५४ लाख ७० हजार रुपये मिळाले आहेत .
या लाभार्थ्यांना मिळणारा लाभ त्वरित थांबवण्याचे आदेश दिले आहेत . व घेतलेली रक्कम ८ दिवसात जमा करावी अशा नोटीसा महसूल विभागाने काढल्या आहेत . सांगोला तालुक्यात १ हजार ५२७ बोगस लाभार्थी आढळल्याने एकच खळबळ उडाली असून हजारो बोगस लाभार्थ्यांचे पितळ उघडे पडले आहे .
सांगोला तालुक्यात आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनी पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेतल्याने खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिले आहेत .आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांनी ८ दिवसात रक्कम जमा करावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार योगेश खरमाटे यांनी दिला आहे .
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ घेतलेल्या बोगस लाभार्थ्यांची तालुका निहाय आकडेवारी
अचकदाणी २४ , आगलावेवाडी ७ , अजनाळे ३२ , अकोला ३३ , आलेगाव २० , अनकढाळ ६. बागलवाडी १० , बलवडी १८ , बंडगरवाडी ८, बामणी ८ , भोपसेवाडी १४ , बुद्धेहाळ ११ , बुरलेवाडी ५ , बुरंगेवाडी ८ , चिणके ११ , चिकमहुद ७१ , चोपडी ५० , चिंचोली १ ९ , देवळे १० , देवकतेवाडी २ , वाकी ४ , धायटी ९ , डिकसळ १४ , डोंगरगाव २१ , एखतपूर १४ , गळवेवाडी ५ , गावडेवाडी ३ , गायगव्हाण ८ , घेरडी ५२ , गोडसेवाडी ४ , गुणापवाडी ४ , गौडवाडी ९ , हबिसेवाडी ८ , हलदहिवडी १० , हंगिरगे २ , हणमंतगाव ६ , जवळा ३७ , हातीद ७ , इटकी ९ , जुनी लोटेवाडी ३ , जुजारपूर १२ , जुनोनी १३ , कडलास ४२ , काळूबाळूवाडी ६ , कमलापूर १ ९ , कराडवाडी ८ , कारंडेवाडी १८ , कटफळ १८ , केदारवाडी १ , खवासपूर ३५ , खिलारवाडी १३ , किडबिसरी १२ , कोळा ३७ , कोंबडवाडी ५ , लक्ष्मीनगर १२ , लिगाडेवाडी १२ , लोणविरे ८ , लोटेवाडी ८ , महिम १ ९ , महूद ६१ , मानेगाव १० , मांजरी २३ , मेडशिंगी १ ९ , मेटकरवाडी ९ , मेथवडे २३ मिसाळवाडी ४ , नलवडेवाडी ६ , नराळे १२ , निजामपूर ६ , नाझरा ७ , पाचेगाव बुद्रुक १२ , पाचेगाव खुर्द ९ , पारे १४ , राजापूर ३ , राजुरी ९ , संगेवाडी २३ , सरगरवाडी ३ , सावे ३३ , शिरभावी १७ , शिवणे ४१ , सोनलवाडी ९ , सोनंद ४५ , सोमेवाडी ७ , तरंगेवाडी १५ , तिप्पेहाळी १८ , उदनवाडी १५ वासुद २ ९ , वझरे ३ , वाढेगाव २ ९ , वाकी घेरडी १४ , वाकी शिवणे २० , वाणीचिंचाळे १४ , वाटंबरे २० , य.मंगेवाडी ३४ , झापाचीवाडी २
0 Comments