ऊस तोडणी मुकादमाने घेतला गळफास; सांगोला तालुक्यातील घटना
By shabdhrekha express November 05, 2020 3:19 PM
Breaking; ऊस तोडणी मुकादमाने घेतला गळफास; सांगोला तालुक्यातील घटना
सांगोला : अज्ञात कारणावरून ऊस तोडणी मुकादमाने दोरीच्या साह्याने लिंबाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवार ५ रोजी सकाळी १० च्या सुमारास वाढेगाव (हजारेवस्ती नं. २ ता. सांगोला) येथे घडली. सचिन बाळू हजारे (वय २८) असे आत्महत्या करणाऱ्या ऊसतोडणी मुकादमाचे नाव आहे. दरम्यान त्याच्या पश्चात आई वडील, भाऊ, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.
वाढेगाव हजारे वस्ती नं. २ येथील ऊस तोडणी मुकादम सचिन बाळू हजारे यांनी बुधवार ४ रोजी ऊस तोडणी कामगारासमवेत आई-वडिलांना कारखान्यावर पाठवून दिले होते,एक कामगार येणे बाकी असल्याने तो पाठीमागे थांबला होता. दरम्यान सचिन हजारे यांनी गुरुवार ५ रोजी सकाळी पत्नी सविताला चुलत्याकडे जाऊन येतो म्हणून घरातून बाहेर पडला बराच वेळ तो आला नाही, मोबाईल स्विच ऑफ लागत होता, म्हणून पत्नी सासऱ्याच्या घराकडे निघाले असता नवरा सचिन हजारे यांनी लिंबाच्या फांदीला गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनास्थळी सपोनि प्रशांत हुले, पोलीस कॉन्स्टेबल धनंजय आवताडे दाखल झाले असून पुढील तपास चालू आहे.
0 Comments