पत्रकार सुरक्षा समितीच्या बैठकीत तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार
शब्दरेखा एक्स्प्रेस/ सोलापूर :
पत्रकार सुरक्षा समितीची मासिक बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये पत्रकारांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, तसेच पत्रकारांच्या मागण्यांसंदर्भात सरकारने विचार न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिला.
यावेळी पत्रकार संरक्षण कायदा, जेष्ठ पत्रकार समान पेन्शन, पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची सखोल चौकशी, पक्की घरे नसलेल्या पत्रकारांसाठी घरकुल योजना व विमा योजना, राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी, यादीवर नसलेल्या वृत्तपत्र ला शासकीय जाहिराती इत्यादी विषयासह कोरोना काळात अनेक वृत्तपत्र बंद असताना राज्यातील अनेक युट्युब चॅनल च्या संपादक आणि पत्रकारांनी आपले कुटुंब बाजूला सारून जीव धोक्यात घालून राज्य सरकार महसूल प्रशासन पोलीस प्रशासन महापालिका प्रशासनाच्या बातम्या केलेल्या आहेत अश्या युट्युब चॅनलला शासकीय मान्यता व जाहिराती द्याव्यात, कोरोना काळात वार्तांकन करताना ज्या पत्रकारांचे निधन झाले आहे, त्यांच्या कुटूंबाला पन्नास लाख रुपये तात्काळ मदत करावी, या मागण्या प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केल्या आहेत.
यावेळी शहर अध्यक्ष अरुण सिदगिड्डी, डॉ रवींद्र सोरटे, अक्षय बबलाद, बिपीन दिड्डी, लक्षण गणपा, प्रसाद जगतात, प्रसाद ठक्का, प्रदीप पेंदापल्लीवार, भास्कर माचण, राजाभाऊ पवार, सतीश गडकरी, वैजिनाथ बिराजदार, प्रभाकर एडके, विवेकानंद खेत्री, आन्सर तांबोळी, भास्कर अल्ली, राकेश वरम, श्रीनिवास पेद्दी, इम्तियाज अक्कलकोटे, दत्तात्रय गांगजी, इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments