होमगार्ड पाच महिन्यांपासून पगाराच्या प्रतीक्षेत ...... तासगाव : पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून आठ तास काम करूनही तुटपुंज्या मानधन तत्वावर काम करून बिन पगारी फुल अधिकारी अशी परिस्थिती गृहरक्षक दल ( होमगार्ड ) यांची झाली आहे . वर्षभरात फक्त 3 ते 4 महिनेच होमगार्ड ना काम दिले जाते.पोलिसांच्या मदतीला वेळोवेळी असणाऱ्या होमगार्डच्या कुटुंबाचा तरी शासनाने विचार करून त्यांचा पगार वेळेवर दयावा.होमगार्डना असलेले मानधन वेळेवर मिळत नसल्याने त्याच्या कुटुंबाचे आर्थिक गणित बिगडत आहे .
त्यामुळे किमान पगार तरी वेळेवर मिळवा अशी मागणी होत आहे . पोलिसांच्या कामाचे तास आणि होमगार्ड यांचे कामाचे तास समान आहेत . दोघांच्याही कामाचे स्वरूप सारखेच आहे . असे असताना होमगार्ड ना अल्प वेतन दिले जाते . कुठलाही बंदोबस्त आलाहोमगार्ड पाच महिन्यांपासून पगाराच्या प्रतीक्षेत ... ... अल्प वेतन दिले जाते . कुठलाही बंदोबस्त आला कि होमगार्ड ना पाचारण केले जाते.तसेच वर्षातून फक्त 3 ते 4 महिनेच त्याना काम असते . इतर वेळी पार्ट टाइम काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागतो . असे असताना गेली सहा महिने झाले पगार जमा झाला नाही . त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्न होमगार्ड कर्मचाऱ्यांसमोर पडला आहे.तरी शासनाने लवकरात लवकर होमगार्ड कर्मचाऱ्यांचा पगार जमा करावा अशी मागणी होत आहे ....
0 Comments