google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तहसील कार्यालयाला लागले झिरो कर्मचाऱ्यांचे ग्रहण ? चिरीमिरी घेतल्याशिवाय कामे होत नसल्याने नागरिक त्रस्त !

Breaking News

सांगोला तहसील कार्यालयाला लागले झिरो कर्मचाऱ्यांचे ग्रहण ? चिरीमिरी घेतल्याशिवाय कामे होत नसल्याने नागरिक त्रस्त !

सांगोला तहसील कार्यालयाला लागले झिरो कर्मचाऱ्यांचे ग्रहण ? चिरीमिरी घेतल्याशिवाय कामे होत नसल्याने नागरिक त्रस्त !


 सांगोला तहसील कार्यालयातील वेगवेगळ्या विभागातील कर्मचारी यांनी आपली पदीय कामे करण्यासाठी खाजगी झिरोंची नेमणूक केली आहे. त्यामुळे हे झिरो जणू आपणच साहेब आहेत या आविर्भावात तहसील आवारात वावरताना दिसत आहेत. या झिरोंना शासकीय दस्तऐवज हाताळणीचा कोणताही अनुभव नाही. शिवाय यांना कोणत्याही प्रकारच्या कागदोपत्रांची माहिती नाही. त्यामुळे अश्या झिरो कर्मचाऱ्यांना शासकीय दस्तऐवज हाताळू देणे हे अत्यंत धोकादायक ठरू शकते.

हे झिरो कर्मचारी शासकीय कर्मचारी यांना नागरिकांकडून चिरीमिरी घेवून वरकमाई करून देत आहेत. त्यामुळे या झिरो कर्मचारी यांची दिवसोंदिवस भलतीच बडदास्त वाढली आहे. हे झिरो कर्मचारी नागरिकांना अरेरावीची भाषा वापरत आहेत. व सर्रास नागरिकांकडून चिरीमिरी ची मागणी करताना दिसत आहेत. या सर्व प्रकाराकडे कोणत्याही वरिष्ठ अधिकारी यांचे लक्ष नाही.त्यामुळे तहसील कार्यालयात वेगवेगळ्या कामानिमित्ताने येणाऱ्या नागरिकांची पिळवणूक होत आहे.

 दिवसोंदिवस तहसील कार्यालयात वाढत आसलेली झिरो कर्मचारी यांची संख्या तालुक्यातील नागरिकांसाठी चिंता वाढवणारी आहे.सांगोला तहसील कार्यालय म्हणजे धर्मशाळा बनत चालले आहे . त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांनी वेळीच लक्ष घालून या झिरो कर्मचारी यांना आवर घालावा अशी मागणी तालुक्यातील सुजाण नागरिकांमधून होत आहे.

Post a Comment

0 Comments