google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला बसस्थाकावरून 13 लाखांचे सोन्याचे विविध दागिने असलेली बॅग लंपास

Breaking News

सांगोला बसस्थाकावरून 13 लाखांचे सोन्याचे विविध दागिने असलेली बॅग लंपास

.सांगोला ( सोलापूर ) : एसटीमधील बाकड्यावर विविध प्रकारचे सोन्याचे दागिने असलेली बॅग ठेवून सराफ पाणी घेण्यासाठी खाली उतरला अनोळखी चोरट्याने ती बॅग चोरून नेल्याची घटना सोमवार ( ता . 9 ) रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सांगोला बसस्थानकावर घडली . या बॅगमध्ये 13 लाख 20 हजार रुपये किंमतीचे विविध सोन्याचे दागिने होते . फिर्यादी संजय पाटील ( रा . इचलकरंजी , ता . हातकणंगले , जि . कोल्हापूर ) यांचा सराफ दुकानदारांना सोन्याचे दागिने विक्री करण्याचा व्यवसाय आहे . संजय पाटील हे सोमवार ( ता . 9 ) रोजी सकाळी सात वाजता विविध प्रकारच्या सोन्याचे दागिने घेऊन पंढरपूर येथील दुकानात विक्री करण्यासाठी गेले . सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पंढरपूर बसस्थानकावरून तुळजापूर ते सांगली जाणारी बस पकडून माघारी निघाले होते .


यावेळी सोन्याचे दागिने असलेली निळ्या रंगाची बॅग एसटीमध्ये बसलेल्या बाकड्याच्या खिडकीच्या बाजूला ठेवलेली होती . ही बस सांगोला स्टॅडवर सायंकाळी साडेसातच्या सुमारास थांबल्यानंतर ते पाण्याची बाटली घेऊन येण्यासाठी बसमधून खाली उतरले . परंतु सोन्याचे दागिने असलेली बॅग तेथेच बाकड्यावर ठेवली होती . पाटील हे पाण्याची बाटली घेऊन येऊन बसमधील बाकड्यावर पाहिले असता त्यांना सोन्याची दागिने ठेवलेली बॅग दिसली नाही . यावेळी त्याने आजुबाजुला शोध घेतला . परंतु बॅग सापडली नाही . या बॅगमध्ये विविध प्रकारच्या 13 लाख 20 हजार रुपये किमतीचे दागिने होते . संजय पाटील यांनी अज्ञात चोरट्याने बॅग चोरून नेल्याची फिर्याद सांगोला पोलिसात दिली आहे .

Post a Comment

0 Comments