सांगोला दि .११ नोव्हे ( शब्दरेखा एक्सप्रेस ) सांगोला शहर हद्दीतील गेली पंचवीस वर्षापासूनचा रस्त्याचा प्रलंबित प्रश्न माढा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईज निंबाळकर यांनी काढला निकाली .
फँबटेक काँलेज परिसरातील अनेक रहिवाशांचे रस्त्या आभावी होणारे हाल थांबविण्यासाठी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रेल्वे विभागाला शिफारसीचे पत्र धाडले आहे . . सांगोला शहर हद्दीतील पंढरपूर रोडवरील फँबटेक कॉलेज शेजारील रेल्वे पुलाखालील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाल्याने परिसरातील नागरिकांना शहराकडे ये जा करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे . या परिसरात वास्तव्यास असलेल्या अनेक रहिवाशांकडून सदरचा रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांच्याकडे केली होती जनतेच्या प्रश्नासंदर्भात चोविस तास उपलब्ध असलेले बापूसाहेब ठोकळे यांनी सदर रस्त्याबाबत संपूर्ण माहीती घेऊन भाजप चे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याशी संपर्क साधत सदर रस्त्याच्या कामाबाबत माढा लोकसभा मतदार संघाचे विद्यमान लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लक्ष देऊन नागरिकांची होणारी गैरसोय दुर करावी अशी मागणी केली . श्रीकांत देशमुख यांनी लागलीच खा.रणजिसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे सदरचा रस्ता दुरुस्त करुन नागरिकांची गैरसोय दुर करावी अशी मागणी केली . या मागणीची खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दखल घेऊन विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना सदरचा रस्ता तात्काळ तयार करण्यात यावा अशी शिफारस करणारे लेखी पत्र पाठवले आहे . बायपास रोड पासून रेल्वे लाईनच्या पश्चिम बाजूस फॅबटेक काँलेज समोरुन बामणे मळ्यापर्यंत पक्का रस्ता करुन मिळावा अशी शिफारस खा.नाईक निंबाळकर यांनी केली आहे बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी या रस्त्याच्या कामा संदर्भात भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख यांनी विशेष प्रयत्न केल्याबद्दल व खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कार्यतत्परता दाखवत रस्त्याचा प्रश्न निकाली काढल्याबद्दल दोन्ही ही नेतेमंडळीचे आभार मानले .
0 Comments