सोलापूर ब्रेकिंग! जिल्ह्यात ‘या’ कारणांसाठी असणार जनावरांच्या बाजाराला व शर्यत लावण्यास बंदी
 by टीम shabdhrekha express
November 10, 2020

Share post
टिम.शब्दरेखा एक्स्प्रेस ऑनलाईन।
मानवावर कोरोनाने हल्ला केल्यानंतर जनावरांना आता लम्पी आजाराने घायाळ केले आहे.जनावरांमधील लम्पी त्वचारोगाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात कोणत्याही गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे बाजार भरविणे, शर्यती लावणे, प्रदर्शन भरविणे, प्राण्यांचे गट करुन कोणतेही काम पार पाडणे यास सक्त मनाई करण्यात आहे.
लम्पीचा सामना करण्यासाठी जिल्ह्याचा पशुसंवर्धन विभाग सज्ज असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त ना.अ.सोनवणे यांनी दिली.

लम्पी त्वचारोग गाय, म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. जनावराच्या शरीरावर गोल गाठी होतात. या रोगाचा प्रसार डास, माश्या, गोचीड इत्यादीमुळे होतो.
बाधित जनावरांपासून निरोगी जनावरास हा आजार होतो. मात्र जनावरांपासून मानवास हा आजार होत नाही. बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावीत.

या रोगामध्ये दोन तीन दिवस ताप राहतो. बाधित जनावराला भुक कमी लागते, दूध कमी देते, अशक्त होते ही लक्षणे दिसून येतात. उपचाराने जनावरी बरी होतात. सर्व बाधित जनावरांना लसीकरण करुन रोगाचा प्रसार थांबविता येतो.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9503487812 हा आमचा नंबर.
0 Comments