प्रधानमंत्री आवास योजनेचा उर्वरित हफ्ता लवकरच लाभार्थ्यांना मिळणार : नगराध्यक्षा राणीताई माने !
शब्दरेखा एक्सप्रेस
खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यामुळे प्रश्न मार्गी लागला
सांगोला/ प्रतिनिधी : सांगोला शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरे बांधण्यात आली होती. यामध्ये राज्य शासन यांचेकडून 1 लाख रु. आणि केंद्राकडून दीड लाख रु. असे अनुदान मिळत होते. परंतु बांधकामे पूर्ण करून सुद्धा काही जणांना केंद्राकडील दीड लाख रु. मिळाले नाहीत. याच गोष्टीचा पाठपुरावा नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडे केला होता.
खासदार निंबाळकर यांनी हा प्रश्न मार्गी लावला असून लवकरच प्रधानमंत्री आवास योजनेचा हफ्ता लाभार्थ्यांना मिळणार असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी दिली. सध्या सांगोला शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेतलेले एकूण 423 नागरिक आहेत. यामध्ये बांधकाम पूर्ण केलेले 22 लाभार्थी आहेत.
या 22 जणांना राज्य शासनाचे 1 लाख रु. मिळाले असून आता केंद्राकडील दीड लाख रु. सुद्धा लवकरच मिळणार आहेत. तसेच स्लॅब लेव्हलला एकूण 202 बांधकामे आहेत. ज्या नागरिकांची बांधकामे पूर्ण झाली आहेत त्यांनी सांगोला नगरपरिषदेमध्ये येऊन प्रधानमंत्री आवास योजनेच्या कार्यालयात इंजि. अमित कोरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही नगराध्यक्षा यांनी केले आहे. फोटो - खा. रणजितसिंह निंबाळकर राणीताई माने
0 Comments