देश कोरोना सारख्या महामारीने पछाडलेला असल्याने आजचा माझा वाढदिवस कोणीही साजरा करू नये -आमदार शहाजीबापू पाटील !
सांगोला प्रतिनिधी 14 ऑक्टोबर रोजी सांगोला विधानसभेचे आमदार एडवोकेट शहाजीबापू पाटील यांचा 64 वा वाढदिवस असून सदरचा वाढदिवस हा कोरोनाची भयानक स्थिती व त्यांचे मोठे बंधू शिवाजी पाटील व लहान बंधू सुभाषनाना पाटील यांच्या दुःखद निधन मुळे साजरा करणार नसल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. मागील कित्येक वर्ष पराभव पचवून यशाच्या शिडीवर चढलेले , युवकांसाठी प्रेरणास्थान असलेले आमदार शहाजीबापू पाटील यांचा आज 14 ऑक्टोबर रोजी 64 वा वाढदिवस आहे. देशामध्ये सध्या कोरोना ची महा भयानक स्थिती निर्माण झाली असून यावर अद्याप कोणतेही ठोस असे औषध निर्माण न झाल्याने देशासह सांगोला तालुक्यांमध्ये देखील अनेक नागरिकांना मृत्यूशी गाठ घालावी लागली आहे. सदरच्या स्थितीचे गांभीर्य लक्षात घेता व आमदार शहाजीबापू पाटील यांचे मोठे बंधू शिवाजी पाटील व लहान बंधू सुभाष नाना पाटील यांच्या दुःखद निधन यामुळे आजच्या वाढदिवसानिमित्त कोणीही हार ,फेटे , शाल, श्रीफळ, केक व बुके असा वायफळ खर्च करून वाढदिवस साजरा करू नये. तसेच शासनाने घालून दिलेले कोरोना संदर्भातील सर्व नियम नागरिकांनी पाळून अनावश्यक कारणास्तव घराबाहेर पडू नये. आपल्यामुळे इतरांना व इतरांमुळे आपल्याला कोरोनाची लागण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी कार्यकर्ते व जनतेला केले आहे.
by शब्दरेखा एक्सप्रेस
newshttp://www.shabdhrekhaexpress.in/2020/10/सांगोला शहर आणि तालुक्यातील बातम्या आणि जाहिराती साठी http://www.shabdhrekhaexpress.in/2020/10/blog-post_12.html श्री संतोष साठे (संपादक) मो नं:९५०३४८७८१२ शब्दरेखा एक्स्प्रेस*न्युज
0 Comments