google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 Shabdhrekha Express www.shabdhrekhaexpress.in

Breaking News

 😍 *मातंग समाजातील तरुण उद्योजकांना ७ लाखांपर्यंत कर्ज योजना*


*JayBhim Today | Govt. Schemes*

साप्ताहिक शब्दरेखा एक्स्प्रेस संतोष साठे


💁‍♂️ *योजनेचा उद्देश* :  महाराष्ट्र शासनाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाजातील लोकांचे जीवनमान उंचविन्यासाठी व तंतु कामाच्या व्यवसायात गुंतलेल्या मातंग समाजाला आधुनिक तंत्रज्ञानाकडे घेऊन जाण्यासाठी व उद्योजक तयार होण्यासाठी हि कर्ज योजना सुरू केलेली आहे.


🧐 *योजनेसाठी प्रमुख अटी* : 

▪ अर्जदार खाली नमूद केलेल्या 12 पोटजातीतील असावा


💰 *दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप* : बीजभांडवल योजनेंतर्गत प्रकल्प मर्यादा 50,001 रुपये ते सात लाखापर्यंत आहे. 50,001 ते 7 लाखापर्यंतच्या मंजूर कर्ज प्रकरणात 10 हजार रुपये अनुदान वगळता उर्वरीत कर्जात 5 टक्के अर्जदारांचा सहभाग, 20 टक्के महामंडळाचे कर्ज (10 हजार रुपये अनुदानासह) व 75 टक्के बँकेची कर्ज रक्कम आहे. महामंडळाच्या कर्जाची परतफेड 4 टक्के व्याजाने महामंडळाकडे करावयाची आहे.


🤔 *योजना कोणासाठी लागू ?* : 1) मांग (2) मातंग (3) मिनी – मादींग (4) मादगी (5) दानखणी मांग (6) मांग महाशी (7) मदारी (8) राधेमांग (9) मांग गारूडी (10) मांग - गारोडी व शासन निणर्य संकिर्ण - 2012 / क्र. 31 महामंडळे दि. 22 मे 2012 नुसार (11) मादगी (12) मादिगा


📝 *आवश्यक कागदपत्रे* : जातीचा दाखला , उत्पन्नाचा दाखला , आधार कार्ड, मतदान कार्ड, राशन कार्ड,  पॅन कार्ड, रहिवाशी प्रमाणपत्र, दोन फोटो, जागेच्या उपलब्धतेचा पुरावा-7/12, भाडेकरार, मालकी हक्क पुरावा इत्यादी तसेच जो व्यवसाय करावयचा असेल अशा व्यवसायाचे कोटेशन, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभव दाखला, वाहन व्यवसाय असल्यास वाहन चालक परवाना 


📬 *संपर्काचे ठिकाण* : जिल्हा व्यवस्थापक, सर्व जिल्हे

➤ आपल्या जिल्ह्यातील समाजकल्याण कार्यालयातील "साहित्‍यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ" या विभागास भेट द्यावी


📍 *टिप* : सदरील योजनेचे नियम वा अटी वा इतर तरतुदी यांमध्ये बहुतांशी बदल असू शकतात. या कारणास्तव वाचकांनी संबंधित विभागास भेट देऊन खात्री करून घ्यावी.


📱 *सर्व क्षेत्रातील अपडेट्ससाठी तुमचा Whatsapp Number रजिस्टर करा.*

http://www.jaybhim.today

Post a Comment

0 Comments