google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 Shabdhrekha Express www.shabdhrekhaexpress.in

Breaking News

 

केंद्रीय रस्ते मंत्रालयाने वाहनधारकांसाठी १ ऑक्टोबर पासून लागू केले नवे नियम ! 

केंद्र सरकारने वाहन चालकांसाठी १ ऑक्टोबरपासून नवे नियम लागू केले आहेत त्यानुसार वाहन चालकांना ड्रायव्हिंग लायसन नोंदणी प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे जवळ बाळगण्याची गरज नाही. तर कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी कोणतेही वाहने रस्त्यावर थांबवता येणार नाही. १ ऑक्टोबर पासून ई चलन, लायसन्स वाहनांचा कागदपत्रांची नोंद माहिती तंत्रज्ञान पोर्टल द्वारे केली जाणार आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने नवीन नियमावली जाहीर केली असून ही नवी नियमावली लवकरच लागू होणार आहे. 
त्यानुसार गाडीच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी यापुढे पोलिसांना वाहन रस्त्यावर थांबवता येणार नाही.ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहनांची कागदपत्रे तसेच यांची सर्व माहिती तंत्रज्ञान पोर्टल द्वारे केली जाणार आहे. परवाना रद्द करणं, नोंदणी करणं, वाहनावरील कारवाईची माहिती देणं ही सर्व कामं इलेक्ट्रॉनिक पोर्टल द्वारे केले जाणार आहेत. या पोर्टलच्या माध्यमातून वाहना बाबतची सर्व माहिती वाहतूक विभागाकडे पाठविली जाणार आहे .आणि वेळोवेळी अपडेट होणार आहे.
गाडीची डिजिटल कागदपत्र ठेवण्यास चालकाला परवानगी असणाऱ्या या नव्या नियमांमुळे रस्त्यावर गाडी अडवून कागदपत्र मागवण्याचा त्रासातून वाहनधारकांची सुटका होईल असा विश्वास रस्ते मंत्रालयाने व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments