google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राजकारणात मी सत्तेचा हव्यास कधी केला नाही : माजी आमदार शहाजीबापू पाटील

Breaking News

राजकारणात मी सत्तेचा हव्यास कधी केला नाही : माजी आमदार शहाजीबापू पाटील

राजकारणात मी सत्तेचा हव्यास कधी केला नाही : माजी आमदार शहाजीबापू पाटील


सांगोला नगरपालिकेत विजयी झालेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांचा चोपडी ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न 

 नगरपालिकेच्या माध्यमातून सांगोला शहरातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी आनंदा माने व सहकारी यांच्यावर जबाबदारी सोपवली: शहाजीबापू पाटील 

सांगोला नगरपालिकेत विजयी झालेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांचा चोपडी ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न 

सांगोला/ प्रतिनिधी: नुकत्याच पार पडलेल्या सांगोला नगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथरावजी शिंदे व

 सांगोला तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगोला नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने दैदीप्यमान यश संपादन केले. लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने व 15 नगरसेवक सेविका या निवडणुकीत विजयी झाले.

 त्यांच्या सन्मानार्थ चोपडी ग्रामस्थांच्यावतीने भव्य नागरिक सत्कार सोहळा शुक्रवार दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी संपन्न झाला. हा सत्कार सोहळा अविस्मरणीय ठरणारा आहे. या सोहळ्यासाठी शेतकरीबांधव ,माता- भगिनी व युवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मोठ्या जल्लोषात मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्याबद्दल बापूंच्याकडून विशेष कौतुक करण्यात आले. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना तालुक्याच्या विकासासाठी

 साडेपाच हजार कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. त्यातून तालुक्यातील विकास कामे मार्गे लावली. अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. रोजगार हमी व पिण्याच्या पाण्यासाठी टँकर ही सांगोला तालुक्याची ओळख पुसण्यासाठी व 

सांगोला तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी माझी सदैव धडपड आहे. सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी एल. बी. केंगार हे सेवेत असताना तालुक्यातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान मोलाचे ठरले आहे. 

तालुक्यातील सध्याचे राजकारण मिटावे ही माझी प्रामाणिक भूमिका आहे. नगराध्यक्ष आनंदा माने यांना सांगोला शहरातील कामे करण्यासाठी मोठी संधी असून त्यासाठी त्यांची निवड केली आहे. मी तालुक्याच्या विकास कामांना प्राधान्य देणारा नेता

 असून कधीही सत्तेचा हव्यास केला नाही.  उद्याची निवडणुकीची लढाई ही मिळून मिसळून झाली तर सोन्यापेक्षा मोलाचे ठरणार आहे. अन्यथा यापुढील निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची तयारी आहे असे विचार माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी चोपडी येथे व्यक्त केले.

चोपडी ग्रामस्थांच्यावतीने माजी आमदार शहाजीबापू पाटील व सांगोला नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेले नगराध्यक्ष, नगरसेवकांचा भव्य नागरी सत्कार सोहळा चोपडी येथे आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी माजी आमदार शहाजीबापू पाटील बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, सांगोला नगरपालिका निवडणूक जनतेने हाती घेतली होती. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा नगरपालिका

 निवडणुकीत कार्यकर्ते, पदाधिकारी व मतदार राजाने काढला आहे. तालुक्याच्या स्वाभिमानासाठी मी राजकारणात अनेक चढउतार अनुभवले आहेत असे प्रतिपादन माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी चोपडी येथे केले.

चोपडी ग्रामस्थांच्यावतीने माजी आमदार शहाजीबापू पाटील व सांगोला नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेले नगराध्यक्ष, नगरसेवकांचा भव्य नागरी सत्कार सोहळा चोपडी येथे आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी माजी आमदार शहाजीबापू पाटील बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, सांगोला नगरपालिका निवडणूक जनतेने हाती घेतली होती. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा नगरपालिका निवडणुकीत कार्यकर्ते, पदाधिकारी व मतदार राजाने काढला आहे.

 तालुक्याच्या स्वाभिमानासाठी मी राजकारणात अनेक चढउतार अनुभवले आहेत असे प्रतिपादन माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी चोपडी येथे केले.

यावेळी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात आर. एस. बाबरसर यांनी चोपडी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या माजी आमदार शहाजीबापू पाटील व नगरपालिका निवडणुकीतील विजयी नगराध्यक्ष नगरसेवकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यापाठीमागील भूमिका स्पष्ट केली. 

बापूंनी केलेल्या कार्याची नोंद घेणे व तालुक्यासाठी केलेल्या विकास कामाची दखल घेऊन भविष्यातील सर्व निवडणुका स्वबळावर लढवून पुन्हा एकदा ऐतिहासिक विजय संपादन करावा 

हा हेतू आहे. जनतेमध्ये सकारात्मक ऊर्जा तयार करण्यासाठी बापूंनी व आनंदमाने यांनी सांगोला नगरपालिका निवडणुकीत विजयाची हॅट्रिक केली आहे. अशीच हॅट्रिक या पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत करावी यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

यावेळी इंजिनिअर गणेश बाबर म्हणाले, सांगोला तालुक्यातील यापूर्वी सन्मानाचं राजकारण होत होतं. परंतु नगरपालिका निवडणुकीत राजकारणाने वेगळीच दिशा घेतली. 

चोपडी गावात उभारण्यात येणारे शिवस्मारक शिवजयंतीपूर्वी पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा सिंहासनावरील पुतळा 

अनावरण करण्यासाठी येणार्‍या अडचणी बापूंनी सोडवण्यात अशी मागणी जय शिवराय कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ तसेच ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. या प्रश्‍नाबाबत प्रशासन वेळोवेळी अडचणी निर्माण करीत आहे.

 यावरती उपाय म्हणून माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी हा विषय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पूर्ण करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब लवटे म्हणाले, राज्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे की, सांगोला तालुक्यात 2016 च्या नगरपालिका निवडणुकीत लोकनियुक्त अध्यक्षा 

म्हणून राणीताई माने व 2025 च्या नगरपालिका निवडणुकीत पती आनंदा माने लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले.  या निवडणुकीत 15 नगरसेवक निवडून येऊन शिवसेनेला सत्ता मिळाली आहे. बापूंनी केलेली विकास कामे

 सुवर्ण अक्षरांनी कोरली जातील. शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहाजीबापू पाटील यांनी विकासासाठी मोठी घोडदौड सुरू केली आहे.

यावेळी चोपडी जिल्हा परिषद गटाचे नेते विजयदादा शिंदे म्हणाले, चोपडी ग्रामस्थांच्या वतीने नगराध्यक्ष नगरसेवकांचा भव्य नागरी सत्कार सोहळा विरोधकांना चपराक देणारा ठरणार आहे. विरोधकांनी आमदार झाल्यापासून कोणतेही विकासाचे काम केले नाही.

 तालुक्यातील विकास कामे बापूंच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली. ही विकास कामे विरोधकांना दिसत नाहीत. नुसती टीका करणे हे त्यांचे काम आहे. कोरडा व माण नदीला कालव्याचा दर्जा मिळाला 

तसेच बुधेहाळ तलाव कायमस्वरूपी टेंभू योजनेत समाविष्ट केला .आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शहाजी बापूंच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे तरच खर्‍या अर्थाने तालुक्याचा विकास होणार आहे.

या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष आनंदा माने, नगरसेविका राणीताई माने, छायाताई मेटकरी, आशादेवी यावलकर,  अनिता केदार, तसेच नगरसेवक माऊली तेली, प्रशांत धनवजीर, काशिलिंग गावडे,

 नगरसेवक अरुण पाटील, चैतन्य राऊत, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी सागरदादा पाटील, तालुकाध्यक्ष दादासाहेब लवटे, चोपडी गावचे सरपंच मंगलताई सरगर, उपसरपंच पोपटशेठ यादव, 

चेअरमन दगडू बाबर, पोलीस पाटील सीतादेवी पाटील, एल बी केंगार, हणमंतशेठ बाबर, बाळासाहेब बाबर फौजी, सुरेश बाबर,श्रीमंत सरगर, उद्योगपती सतीश पाटील, 

ग्रामपंचायत सदस्य दिनेश बाबर, प्रशांत डोंगरे, शकुंतला बाबर, सचिन खळगे, भाऊसाहेब बाबर,उद्योगपती विकास मोहिते,  रमेश शिंदे गुरुजी,सेवानिवृत्त सुभेदार अमोल बाबर, पोपट बाबर, प्रताप पाटील  संतोष यादव, लक्ष्मण चौगुले, बापूराव यादव, 

सिद्धेश्‍वर बाबर, बंडू मेखले,विलास बाबर, शरद बाबर, विविध गावातील सरपंच, उपसरपंच , सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व युवावर्ग शेतकरीबांधव ,माता- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक लखन खांडेकर यांनी केले तर उपस्थित त्यांचे आभार निवेदक राहुल बाबर यांनी मानले.

तालुक्यातील राजकारण्यांनी बापूंना नगरपालिका निवडणुकीत एकटे पाडले असले तरी जनतेने नगराध्यक्ष नगरसेवकांना भरघोस मतांनी विजयी केले. 

सांगोला शहरातील जनता माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पाठीशी आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला एक हाती सत्ता मिळाली आहे. 

विजय झाल्यानंतर मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजयी उमेदवारांचा सन्मान करीत तालुक्याच्या विकासासाठी 190 कोटी रुपयांचा निधी दिला. बापू मुंबईहून कधीही रिकाम्या हाती परत येत नाहीत. प्रत्येक वेळी विकास कामासाठी निधी आणतात हे वैशिष्ट्य आहे. 

बापूंनी सांगोला शहराच्या विकासासाठी 200 कोटी रुपये निधी खर्च केला .नगरविकास मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याने सांगोला नगरपालिकेच्या विकासासाठी भरपूर निधी मिळणार आहे. आगामी जिल्हा परिषद,

 पंचायत समिती निवडणुका स्वतंत्रपणे लढूया. त्यासाठी सर्वांनी एकसंघपणे बापूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. चोपडी ग्रामस्थांनी नगराध्यक्ष व नगरसेवकांचा केलेला सन्मान सोहळा अविस्मरणीय व प्रेरणा देणार आहे : लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने

चोपडी येथे सत्कार सोहळ्या प्रसंगी माजी आमदार शहाजीबापू पाटील व नगरसेवक पदाधिकारी व मान्यवर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. चोपडी येथे मान्यवरांचे भव्य दिव्य स्वागत व सत्कार संपन्न झाला.

चोपडी गावचे सुपुत्र हणमंत बाजीराव बाबर यांनी बैलगाडा शर्यतीमध्ये नवलौकिक मिळवल्याबद्दल त्यांचा माजी आमदार शहाजीबापू पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदाभाऊ माने यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments