काय ती झाडी, काय ते डोंगार... शहाजी बापूंची तोफ
आता मुंबईत धडाडणार, पहिले टार्गेट संजय राऊत
सोलापूर:आपल्या ग्रामीण भाषेने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारे शहाजी बापू पाटील आता मुंबईसह महाराष्ट्रातील
29 महापालिका निवडणूक प्रचारात उतरणार आहेत. येत्या 5 जानेवारीपासून बापूंची तोफ धडाडण्यास सुरुवात होणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी बापूंना प्रचारासाठी मुंबईत बोलावले आहे. शिंदेंच्या आदेशानुसार
मुंबईसह सर्वत्र धडाकेबाज प्रचार सभा घेणार असल्याचे बापूंनी 'माझा'शी बोलताना सांगितले
मुंबई महायुतीचा प्रचार आपण करणारा असल्याचे सांगताना संजय राऊत सारख्याला तर कस्पटासारखा उडवून लावेन असं आव्हान शहाजी बापू पाटील यांनी दिलं.
मुंबईत खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याशी सामना होणार असला तरी आम्ही राजकीय विरोधक असून प्रत्येक टीकेला सडेतोड उत्तर देणार असल्याचे बापूंनी सांगितले.
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत जाऊन खूप मोठी चूक केली. त्यांचे वलय आणि अस्तित्व हळूहळू संपत जाईल.
ते स्वतंत्र लढले असते, मात्र आता राज ठाकरे निस्तेज होत जातील आणि उद्धव ठाकरे याचा फायदा घेतील असा टोलाही शहाजी बापूंनी लगावला.
मुंबईत महायुतीने केलेल्या विकासकामांवरच भाषणात भर असेल.
मात्र मुंबई महापालिकेपासून तोडण्याचा जो खोटा प्रचार होईल त्याची चिरफाड आपण करणार असल्याचा इशाराही
शहाजी बापूंनी ठाकरे बंधूंना दिला आहे. मुंबई महाराष्ट्र पासून तोडण्याची भाषणबाजी ते
फक्त निवडणुकीचे 15 दिवसच करतात, मात्र याला चोख भाषेत उत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिला.
मुंबईसाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले होते आणि आता मुंबई कुणी महाराष्ट्रापासून तोडण्याचा कोणी प्रयत्न केला
तर आम्ही एक लाख पाच हजार जीव देण्यासाठी समर्थ आहोत असंही शहाजी बापू यांनी म्हटलं.
Sangola Election : सांगोल्यात बापूंनी गड राखला
सोलापूरच्या सांगोलामध्ये शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटील यांची एकहाती सत्ता आली.
सांगोला नगरपरिषद पदाच्या उमेदवार आनंदा माने या विजयी झाल्या आहेत. आनंदा माने या 4 हजार 775 मतांनी विजयी झाल्या.
सांगोलामध्ये शिवसेनेविरोधात भाजप, ठाकरेंची शिवसेना आणि शेकापनी युती केली होती,
त्यामुळे शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अखेर सांगोल्यात 20 पैकी 17 जागांवर विजय मिळवत शहाजीबापूंनी गड राखला.


0 Comments