मोठी बातमी...सांगोला शहरात गुटखा-पानमसालावर धडक कारवाई
अन्न व औषध प्रशासन-पोलीस संयुक्त छापा; 26 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला:- महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूविरोधात अन्न व औषध प्रशासन (ऋऊ-) व सांगोला पोलिसांनी संयुक्तपणे मोठी कारवाई करत शहरात खळबळ उडवून दिली.
बुधवार (दि. 31) करण्यात आलेल्या या कारवाईत विविध ठिकाणांहून व वाहनांमधून सुमारे 26 लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित साठा व वाहने जप्त करण्यात आली.
शहरालगत मेडशिंगी परिसरात गस्तीदरम्यान संशयास्पदरीत्या फिरणार्या सुझुकी ईरटीगा (घ--02 चच्-6330) या वाहनाची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात कॉकटेल पानमसाला व सी.सी. अल्फा सुगंधित तंबाखू आढळून आला.
या प्रकरणी प्रकाश यमण्णाप्पा दोडामणी (वय 27, रा. उत्तनाळ, जि. विजापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहनासह सुमारे 6.52 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, मस्के कॉलनी, एखतपूर रोड, सांगोला येथे अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सुभाष भुसे यांच्या नेतृत्वाखाली घर, पानटपरी, गोडाऊन व वाहनांवर छापे टाकण्यात आले. या तपासणीत
स्कार्पिओ वाहन (चक-12 ऊध-9391) तसेच गोडाऊनमधून विविध ब्रँडचा गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व सुपारी असा मोठा साठा आढळून आला.
या कारवाईत अनिल रामचंद्र मस्के व अक्षय अनिल मस्के यांच्याशी संबंधित ठिकाणांहून सुमारे 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित गोडाऊन सील करण्यात आले आहे.
या दोन्ही प्रकरणांत आरोपींविरोधात अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जप्त साठ्याचा उगम, पुरवठादार व वितरक साखळीचा तपास सुरू असून, या अवैध धंद्यात सहभागी असलेल्यांवर पुढील काळातही कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.


0 Comments