माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांना टॅलेंट कट्टा महाराष्ट्र यांच्यातर्फे सह्याद्रीरत्न राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांंगोला - सांगोला नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांना टॅलेंट कट्टा महाराष्ट्र यांच्यातर्फे सह्याद्रीरत्न राज्यस्तरीय गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, भारत सरकार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय नोंदणीकृत संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दिला जात आहे.
सोमेश यावलकर यांनी सांगोल्यात अनेक वर्षे समाजसेवा, नागरिकांच्या अडचणींचे निराकरण, युवकांसाठी मार्गदर्शन,
विविध सामाजिक उपक्रम राबविणे तसेच विकासकामांसाठी सातत्याने प्रयत्न केल्यामुळे त्यांना हा सन्मान मिळाला आहे.
रविवार दि.१४ डिसेंबर रोजी पुणे येथे राज्यभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत सोमेश यावलकर यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सोमेश यावलकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.


0 Comments