खळबळजनक..सासरच्या मंडळींकडून चारित्र्यावर संशय, सततच्या त्रासाला कंटाळून पत्नीचं टोकाचं पाऊल, सोलापूरच्या मोहोळमध्ये खळबळ
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सासरच्या मंडळानी दिलेल्या त्रासाला कंटाळून मोहोळ येथील एका विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केलीय. स्वाती जयंत थोरात असे मृत 33 वर्षीय महिलेचे नाव आहे.
स्वाती हिचा मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी येथील जयंत थोरात यांच्यासोबत 2015 साली विवाह झाला होता.मात्र लग्नानंतरपासून सासरची मंडळी हे वारंवार तिला त्रास देतं होते. काही दिवसापासून तीच्या चारित्र्यवर देखील संशय घेण्यात येत होता.
तसेच माहेरहून 5 लाख रुपये घेऊन ये असा तगदा देखील लावण्यात आल्याचा आरोप मृत स्वातीच्या कुटुंबियांनी केलाय. याचं त्रासाला कंटाळून स्वातीहिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय.
या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी स्वातीचे पती जयंत थोरात, सासरे चंद्रकांत थोरात, सासू सिंधुमती थोरात, नणंद आश्विनी पाटील या सर्वांच्या विरोधात मोहोळ पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आलाय.


0 Comments