google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लोकनेते गणपतराव देशमुखांचे स्मारक सांगोल्यात मध्यवर्ती ठिकाणी उभारावे; आ. बाबासाहेब देशमुख यांची विधानसभेत भूमिका!

Breaking News

लोकनेते गणपतराव देशमुखांचे स्मारक सांगोल्यात मध्यवर्ती ठिकाणी उभारावे; आ. बाबासाहेब देशमुख यांची विधानसभेत भूमिका!

लोकनेते गणपतराव देशमुखांचे स्मारक सांगोल्यात मध्यवर्ती ठिकाणी उभारावे; आ. बाबासाहेब देशमुख यांची विधानसभेत भूमिका!


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : सांगोला तालुक्याचे तब्बल ५५ वर्षे प्रतिनिधित्व करून लोकनेते म्हणून ओळख निर्माण केलेले स्व. गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाची उभारणी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी करावी,

 अशी आग्रही मागणी सांगोला मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी हिवाळी अधिवेशनात सरकारकडे केली.सांगोला शहर व उपनगराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या अनेक प्रलंबित प्रश्नांवरही त्यांनी लक्षवेधी सूचना मांडल्या.

आमदार देशमुख म्हणाले, "महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा कायदा १९७१ लागू न झाल्यामुळे सांगोला शहरातील संगत राहिवाश्यांना मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे.

 यासाठी तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत." पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलांसाठी मिळणारा २.५० लाख रुपये निधी अपुरा असल्याने तो ५ लाखांपर्यंत वाढवावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी त्यांनी केली.

शहरातील आंगणवाडी केंद्रांची कमतरता लक्षात घेता आनंद नगर, संजय नगर, महात्मा नगर, यश नगर, लक्ष्मी नगर, नरेंद्र नगर, बनकर वस्ती आणि चिंचोली रोड परिसरात नवीन केंद्रे सुरू करावीत, अशी सूचना त्यांनी केली. 

वाढत्या घनकचरा व्यवस्थापनासाठी कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी करावे, तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

भुयारी गटारींच्या कामामुळे निर्माण झालेली दुष्परिणामकारक धूळ, तसेच बिघडलेले शहरातील रस्ते याकडे लक्ष वेधत त्यांनी दुरुस्तीसाठी भरीव निधीची तरतूद करावी अशी मागणी केली. तसेच डंपिंग ग्राउंड शहराबाहेर हलवावे,

 मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानासाठी तातडीची जागा उपलब्ध करून द्यावी व माजी सैनिकांसाठी सैनिक भवन मंजूर करावे,

 अशी मागणीही त्यांनी सभागृहात मांडली. विविध समाजांसाठी समाजमंदिर उभारणीसाठी आर्थिक मदतीचाही त्यांनी मुद्दा उपस्थित केला.

'उमेद' कंत्राटी कर्मचाऱ्यांची कायम नियुक्ती आणि मानधनवाढ करावी

हिवाळी अधिवेशनात आमदार डॉ. देशमुख यांनी उमेद अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची कायम नियुक्ती आणि मानधनवाढ या महत्त्वाच्या प्रश्नाकडेही सरकारचे लक्ष वेधले. महिलांच्या सबलीकरणासाठी व ग्रामविकासासाठी काम करणारे

 हे कर्मचारी अनेक वर्षे कंत्राटावरच कार्यरत असून त्यांना नोकरीची स्थिरता किंवा योग्य वेतन उपलब्ध नाही, याची त्यांनी उपस्थिती नोंदवली. 

आमदार देशमुख यांच्या या ठोस भूमिकेमुळे उमेद अभियानातील कर्मचार्‍यांमध्ये समाधान व आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments