google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक...तिने विरोध केला अन् तो म्हणाला 'चल तुला संपवतो!' ऊसाच्या शेतात घेऊन जाऊन पत्नीसोबत केलं भयंकर कृत्य

Breaking News

धक्कादायक...तिने विरोध केला अन् तो म्हणाला 'चल तुला संपवतो!' ऊसाच्या शेतात घेऊन जाऊन पत्नीसोबत केलं भयंकर कृत्य

धक्कादायक...तिने विरोध केला अन् तो म्हणाला 'चल तुला संपवतो!'


ऊसाच्या शेतात घेऊन जाऊन पत्नीसोबत केलं भयंकर कृत्य

सोलापूर: विवाहबाह्य संबंधांच्या वादातून पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

जकप्पा मणगेरी पुजारी असे आरोपी पतीचे नाव असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्याची पत्नी सविता जकप्पा पुजारी (वय 35, रा. हत्ताळी, जि. विजयपूर, कर्नाटक) हिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

 ऊसतोडणी कामगार जकप्पा पुजारी याचे कर्नाटकमधील विजयपूर येथील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. सविताने या संबंधांना तीव्र विरोध केल्याने पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होता.

दक्षिण सोलापूरमधील वडापूर येथे हे दाम्पत्य काही दिवसांपूर्वी ऊसतोडणीच्या कामासाठी आले होते. याच ठिकाणी पुन्हा एकदा त्यांच्यात जोरदार भांडण झाले. 

हा वाद इतका वाढला की, संतप्त झालेल्या जकप्पाने जवळच पडलेल्या धारदार कोयत्याने पत्नी सविताच्या डोक्यावर आणि मानेवर सपासप वार केले, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त करून आरोपी जकप्पा पुजारी याला त्वरित अटक केली आहे. मंद्रूप पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments