google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..मंगळवेढ्याचा तत्कालीन नायब तहसीलदार ४० हजाराची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात; ६० हजारांच्या रोकडसह घरात सापडले इतर ऐवज; महसुल विभागात उडाली मोठी खळबळ

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..मंगळवेढ्याचा तत्कालीन नायब तहसीलदार ४० हजाराची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात; ६० हजारांच्या रोकडसह घरात सापडले इतर ऐवज; महसुल विभागात उडाली मोठी खळबळ

ब्रेकिंग न्यूज..मंगळवेढ्याचा तत्कालीन नायब तहसीलदार ४० हजाराची लाच घेताना अँटी


करप्शनच्या जाळ्यात; ६० हजारांच्या रोकडसह घरात सापडले इतर ऐवज; महसुल विभागात उडाली मोठी खळबळ

मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी ४० हजाराची लाच घेणाऱ्या उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे

 याला पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल सोमवारी रंगेहाथ पकडले.ही कारवाई सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

चंद्रकांत काशिनाथ हेडगिरे (वय ५२) असे अॅटी करप्शनने ताब्यात घेतलेल्या निवासी नायब तहसीलदाराचे नाव आहे.

तक्रारदार मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी हेडगिरे याने ६० हजार रुपयांची लाच मागितली होती तडजोडी अंती ४० हजार रुपये ठरले होते. ती घेताना काल सोमवारी रंगेहाथ पकडण्यात आले.

हेडगिरे याला ताब्यात घेऊन सोलापूर शहरातील अँटी करप्शन कार्यालयात नेण्यात आले असून पुढील कार्यवाही वेगाने सुरू आहे.

विशेष म्हणजे पुण्याच्या अँटी करप्शन विभागाने ही कारवाई केल्याचे समोर आले आहे. दोनच दिवसांपूर्वी सोलापूर शहरातील मंडलाधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात सापडला अशी जोरदार अफवा पसरली होती.

परंतु ती अखेर अफवाच निघाली. लगेच दोन दिवसांनी उत्तर तहसील कार्यालयातच ही कारवाई झाली आहे.

दरम्यान मंगळवेढा येथेही असताना दोघांना लाचलुचपत विभाग आसल्याची कुणकुण लागताच सदर अधिकारी याने फरार होवून बदलीसाठी विशेष प्रयत्न केले 

व बदलीचा आदेश घेवून तो उत्तर सोलापूर येथे सुखरूप हजर झाला. सेतू, महा-ईसेवा चालकांना मोठ्या प्रमाणावर त्रास दिल्याचे बोलले जात आहे.

मात्र उत्तर तहसीलमध्ये तो वाचू शकला नाही, अखेर त्याच्यावर लाचलूचपत विभागाची कारवाई झालीच.

घरातसापडली ६० हजारांचीकॅश कारवाई झाल्यानंतर लगेच हेडगिरे याच्या घराची झडती घेण्यात आली. यांसाठी टीमने घेतलेल्या 

झडतीमध्ये जवळपास ६० हजार रुपयांची कॅश आढळली. याशिवाय इतर काही ऐवज सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Post a Comment

0 Comments