सांगोला नगरपरिषदेमधील कर्मचारी नंदकुमार बनकर यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला नगरपरिषद कर्मचारी श्री. नंदकुमार बनकर हे आज दिनांक 31.12.2025
रोजी नियत वयोमानानुसार 43 वर्षाच्या दीर्घ सेवेनंतर शिपाई या पदावरून सेवानिवृत्त झाले.
यावेळी त्यांच्या सेवाकालावधीतील GPF ची एकूण जमा रक्कम डॉ. सुधीर गवळी, मुख्याधिकारी यांनी त्यांच्याकडे सुपूर्द केली. सदर प्रसंगी डॉ सुधीर गवळी यांनी
श्री. नंदकुमार बनकर यांना मुख्याधिकारी यांच्या खुर्चीत बसवून त्यांचा सन्मान केला.
सदर कार्यक्रमाला नगरपरिषदेचे सर्व विभाग प्रमुख व इतर कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.


0 Comments