धक्कादायक ! मुलाकडून जन्मदात्या वडिलांची हत्या, दगडाने ठेचून केला खून: ... मंगळवेढा हादरलं
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
मंगळवेढा तालुक्यात काल शुक्रवारी रात्रीच्या सुमारास माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
डोणज परिसरात एका ४० वर्षीय नराधम मुलाने आपल्या वडिलांचा दगडाने ठेचून खून करून निर्घृण हत्या केली. या हत्याकांडामुळे संपूर्ण मंगळवेढा तालुका हादरून गेला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मयतचे नाव महादेव कुसाप्पा पुजारी (वय 70 रा. डोनज ता.मंगळवेढा) असे असून आरोपी मुलगा काशीनाथ महादेव पुजारी (वय 40) याला पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगीड्डे, पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर, विजय पिसे यांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवेढा तालुक्यातील डोनज येथील काशिनाथ पुजारी यांने यातील मयत वडील महादेव कुसाप्पा पुजारी हे शेतात वाटणे देत नाहीत, जनावरे शेतातील पिकात गेल्याचे कारणाने भांडण करतात,
घरात पुरेशी पाणी भरू देत नाहीत आदी या कारणाचा राग मनात धरून, त्यांच्या डोक्यात दगड घालुन गंभीर दुखापत करुन त्यांचा खुन केला असल्याचे विकास कोरे यांनी दिलेल्या फिर्यादी म्हंटले आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर हे करीत आहेत. मंगळवेढा पोलीस ठाण्यात 1069/2025 BNS कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


0 Comments