सांगोला नगरपरिषद निवडणुकीत नवा चेहरा पुढे!सांगोला नगरपालिका प्रभाग क्रमांक 11 मधून मा.उन्मेष लक्ष्मणराव खंडागळे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला — येत्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला नगरपालिका प्रभाग क्रमांक 11 मधून मा.उन्मेष लक्ष्मणराव खंडागळे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे.
मा.उन्मेष खंडागळे हे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. परेश खंडागळे यांचे बंधू असून, त्यांनी सांगोला शहरातील विकासकामे, स्वच्छता, शिक्षण व युवकांच्या प्रश्नांवर विशेष लक्ष देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
“जनतेचा विश्वास संपादन करून प्रभाग क्रमांक 11 मध्ये विकासाचा नवा अध्याय लिहायचा आहे,” असे मत उन्मेष खंडागळे यांनी व्यक्त केले.
सांगोला शहरात त्यांच्या उमेदवारीमुळे तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, नागरिकांमधूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.


0 Comments