साताऱ्यात 13 वर्षीय छकुलीची निर्दयीपणे हत्या, सासपडेकरांचा आक्रोश; नेमकं प्रकरण काय?
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सातारा : सातारा जिल्ह्यातील सासपडे येथील एका घटनेने संपूर्ण देश हादरला होता. काही दिवसांपूर्वी 13 वर्षीय आर्या सागर चव्हाण या शाळकरी मुलीची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती.
याप्रकरणी राहुल बबन यादव या 35 वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे.
पण, या प्रकरणानंतर आता संपूर्ण सासपडे गावच नव्हे तर संपूर्ण सातारा तसेच पश्चिम महाराष्ट्र पेटला आहे. 13 वर्षीय छकुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करण्यात येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, 13 वर्षीय शाळकरी मुलगी आर्या चव्हाण शाळेतून आल्यानंतर तिने कुटुंबियांकडून चावी घेतली आणि ती घरात गेली. त्यानंतर ती कपडे बदलत असताना
तेव्हा राहुलने घरात कोणीही नसल्याचे पाहून तो घरात शिरला. त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने राहुलला विरोध दर्शवला.
त्यानंतर तिच्या डोक्यात जात्याने हल्ला केल्याची माहिती राहुलने पोलिसांना दिली. या प्रकरणातील आरोपी राहुल हा तिच्याच घराजवळ राहणारा असल्याने गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
ही घटना समोर आल्यानंतर संशयित आरोपीविरोधात जनक्षोभ उसळला. संशयिताच्या घराला लक्ष्य करत जमावाने घराची तोडफोड केली. स्थानिकांनी नराधमाच्या घरावर दगडफेक करत
पत्रे उचकटले. या सर्व घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सासपडेसह, हरपळवाडी, गणेशवाडी या गावांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला होता.
दरम्यान, मुलीचा हत्या करणाऱ्या राहुल यादवला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सासपडे ग्रामस्थांसह सातारा सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आली.
मोर्चापूर्वी जमलेल्यांनी आर्यास श्रद्धांजली अर्पण करत या गुन्ह्याचा तपास तातडीने करत खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणीही करण्यात आली आहे.


0 Comments