google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला मदत व‌ पुनर्वसन मंत्र्यांनी दिला होकार

Breaking News

आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला मदत व‌ पुनर्वसन मंत्र्यांनी दिला होकार

आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला मदत व‌ पुनर्वसन मंत्र्यांनी दिला होकार


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील चारा छावणीतील बिले त्वरीत अदा करण्याची आमदार बाबासाहेब देशमुख यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मा.ना.मकरंद पाटील यांच्या कडे केली मागणी..

सांगोला मंगळवेढा चारा छावणी धारकांचे प्रलंबित असलेल्या अनुदानाबाबत आज मंत्रालयात मदत पुनर्वसन मंत्री मा. ना. श्री. मकरंद आबा ,पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. चारा छावणी धारकांची प्रलंबित असलेले अनुदान लवकरात लवकर देण्याची मागणी 

आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी केली .या आगोदर आपण प्रलंबित बिला बाबत सकारात्मकता दाखवली होती आता ती बिले त्वरीत अदा करण्यात यावी अशी मागणी आमदारसाहेबांनी केली.

आमदार साहेबांच्या सदर मागणीचा विचार करून आजच्या बैठकीत मदत व  पुनर्वसन मंत्री श्री.मकरंद आबा पाटील यांनी बिले देण्याबाबत सकारात्मकता दाखवली व चारा छावणीची प्रलंबित अनुदान   लवकरात लवकर 

 वितरित करण्यासाठी निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीत मंत्री महोदयांनी निर्देश  देण्यात आले.  बैठकीला राज्याचे प्रधान सचिव मदत व पुनर्वसन सचिव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments