google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पोलीस ठाण्यात व्यापारी व सराफ असोसिएशनसोबत बैठक – सुरक्षाविषयक महत्त्वाचे निर्णय उपविभासांगोलागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे

Breaking News

सांगोला पोलीस ठाण्यात व्यापारी व सराफ असोसिएशनसोबत बैठक – सुरक्षाविषयक महत्त्वाचे निर्णय उपविभासांगोलागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे

सांगोला पोलीस ठाण्यात व्यापारी व सराफ असोसिएशनसोबत बैठक – सुरक्षाविषयक महत्त्वाचे निर्णय DYSP  मा.बसवराज शिवपूजे


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

सांगोला :- दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता सांगोला पोलीस ठाण्यात व्यापारी व सराफ असोसिएशन यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

 या बैठकीस मंगळवेढा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे तसेच सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  विनोद घुगे अध्यक्षस्थानी होते.

बैठकीदरम्यान व्यापारी वर्गाच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यावर योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. व्यापारी वर्गाची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगून पुढील सूचना देण्यात आल्या –

प्रत्येक व्यापाऱ्याने आपल्या दुकानाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.

दुकानांच्या सुरक्षेसाठी प्रशिक्षित सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी.

प्रवेश व भेटीकरिता स्वतंत्र व्हिजिट नोटबुक ठेवावे, ज्यामध्ये येणाऱ्या-जाणाऱ्यांची नोंद होईल.

या निर्णयांमुळे व्यापारी व सराफ असोसिएशनला अधिक सुरक्षित वातावरण लाभेल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला. व्यापाऱ्यांनीही पोलिसांच्या या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला.

Post a Comment

0 Comments